Headlines

‘दिलखुलास’ कार्यक्रमात मानसशास्त्रज्ञ डॉ.वृषाली राऊत यांची मुलाखत

[ad_1]

मुंबई, दि. ३ माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात औद्योगिक मानसशास्त्रज्ञ डॉ.वृषाली राऊत यांची मुलाखत पुनःप्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

लोकआग्रहास्तव या मुलाखतीचे पुनःप्रसारण मंगळवार, दि. ४ जानेवारी, बुधवार दि. ५ जानेवारी आणि गुरुवार दि. ६ जानेवारी २०२२ रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर या अॅपवरून सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत करण्यात येईल.

कामाच्या ठिकाणचे मानसिक आरोग्य, मानसिक आरोग्याचा व कामाच्या गुणवत्तेचा संबंध, भारतात मानसिक आरोग्याच्या बाबतीत नेमकी स्थिती, कामगारांचे मानसिक आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने उपाययोजना, आरोग्य व त्याचे प्रकार, नोकरी व व्यवसायाशी संबंधित मानसिक आरोग्य, ‘वर्क फ्रॉम होम’चा मानसिक आरोग्यावर झालेला परिणाम, वेल बिईंग ही संकल्पना आदी विषयांची सविस्तर माहिती डॉ. राऊत यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.

००००

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *