‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांची मुलाखत

मुंबई, दि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर सोमवार दि. १७ आणि मंगळवार दि. १८ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

मुंबईतील कोरोनाची सध्याची परिस्थिती, नागरिकांचे लसीकरण, युवकांचे लसीकरण, ऑक्सिजन पुरवठा, हॉस्पिटलमधील खाटांचे व्यवस्थापन, लहान मुले व पालकांनी घ्यावयाची काळजी आदी विषयांची सविस्तर माहिती डॉ. गोमारे यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

Source link

Leave a Reply