DID लिटिल मास्टर्सच्या सेटवर पतीचा ‘तो’ व्हिडिओ पाहून मौनी रॉयला कोसळलं रडू; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण


मुंबई : येत्या शनिवारी  प्रेक्षकांना एक खास ट्रीट मिळणार आहे.  डीआयडी लिटिल मास्टर्सचे स्पर्धक वेडिंग स्पेशल एपिसोडमध्ये काही उत्कृष्ट परफॉर्मन्स सादर होणार आहेत. शूटिंग दरम्यान, जजच्या पती-पत्नींना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र मौनी रॉयचा पती सूरज नांबियार येऊ शकला नाही. पण त्याने एका सुंदर व्हिडिओ मेसेजद्वारे मौनीला सरप्राईज दिलं आणि या मेसेजने मौनी खूप भावूक झाली.

खरं तर, शूटिंग दरम्यान मौनीने सेटवर आपल्या पतीला किती मिस करते हे सांगितलं होतं. मात्र तिच्या पतीने देखील तिला निराश केलं नाही आणि या आश्चर्यकारक व्हिडिओने मौनीच्या डोळ्यात पाणी आलं.

या व्हिडिओमध्ये सूरज म्हणाला की, ‘मी मौनीला 4 वर्षांपूर्वी माझ्या मित्रांच्या पार्टीत भेटलो होतो. ती इतकी सुंदर दिसत होती की, मला तिच्यावरून नजर हटवता येत नव्हती. तिच्याशी संभाषण सुरू करण्यास मदत केली आणि मग आम्ही आमचे नंबर एकमेकांना दिले. हळू-हळू आम्ही डेटिंग करू लागलो आणि एक दिवस जेव्हा मौनी, मी आणि काही मित्र सुट्टीवर गेलो होतो तेव्हा आम्ही मौनीसाठी एक छोटंसं सरप्राईज प्लॅन केलं होतं.

तिला माहित नव्हतं की, मी तिला प्रपोज करणार आहे. मी तिच्यासाठी तिचं आवडतं गाणं बॅकग्राउंडमध्ये ठेवलं आणि नंतर सुंदर सनसेटच्या बॅकड्रॉपमध्ये तिला प्रपोज केलं . आमच्या लग्नाला तीन महिने झाले आहेत आणि मी सांगू इच्छिते की, त्याच्यासोबत असणं खूप छान वाटतं.”

मौनी पुढे म्हणाली, ”सूरजला भेटण्याआधी मी थोडाशी शांत असायचे, पण त्याने मला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवला.  मला माझे विचार मोठे  करायचे आहेत आणि या क्षणी असण्याची जादू अनुभवायची आहे. मला वाटतं की, त्यानेच मला जीवनातील खऱ्या जादूची ओळख करून दिली. त्याला माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मला खूप कृतज्ञ वाटतं. तो माझा खरा जीवनसाथी आहे आणि मी त्याच्यावर खूप प्रेम करते.”Source link

Leave a Reply