‘धर्मवीरा’ला डोळे भरुन पाहण्यासाठी ठाणेकर एकवटले; कुठे आणि कशी घडला हा भरतमिलाप

[ad_1]

मुंबई : सध्या महाराष्ट्रभर एकचं चर्चा आहे ती म्हणजे ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची. कट्टर शिवसैनिक अशी ओळख असणाऱ्या दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा या चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

चित्रपटात आनंद दिघेंची भुमिका अभिनेता प्रसाद ओक साकारत आहे. प्रविण तरडे दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नक्कीचं धुमाकूळ घालणार अशा चर्चाही रंगल्या आहेत. (Dharmaveer anand dighe )

आनंद दिघे यांचा गड म्हणजे ठाणे. ही त्यांची कर्मभूमीच म्हणणं वावगं ठरणार नाही. अन्यायाला वाचा फोडणारा न्याय दिघेसाहेब करत गेले आणि पाहता पाहता त्यांच्या समर्थकांची संख्या लक्षणीयरित्या वाढत गेली. (Dharmaveer movie)

दिघे फार कमी वयातच जग सोडून गेले. पण, त्यांना मिळालेलं देवत्त्वं आजही कायम आहे. असं म्हणतात की ठाण्यात अशीही काही घरं आहेत जिथे देवाच्या मूर्तींसोबतच दिघेंचे फोटोही पूजेसाठी ठेवण्यात येतात. 

अशाच या ठाणेकरांसाठी त्यांच्या लाडक्या दिघेसाहेबांची भेट घडवून आणण्याचा एक लहानसा प्रयत्न नगरविकास मंत्री – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी बऱ्याच शिवसैनिकांनी गर्दी केली होती. 

मोठ्या दिमाखात दिघेसाहेब ठाणेकरांच्या भेटीला आले आणि त्यांच्याच नावाचा जयघोष तिथं सुरु झाला. चित्रपट सुरु होण्यापूर्वी आनंद दिघेंच्या पोस्टरवर अभिषेक करण्यात आला. लेझिमच्या तालावर प्रेक्षकांनी सिनेमागृहात मध्ये प्रवेश केला.

ठाण्यातील या खास आयोजनात खासदार श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक आणि सेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *