धनश्री वर्माने दिली गुड न्यूड


मुंबई : टीम इंडियाचा खेळाडू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree verma) ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता धनश्री वर्माने एक गुड न्युज दिली आहे. या गुड न्युजमुळे चहल आणि चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान ही गुड न्युज नेमकी काय आहे ते जाणून घेऊयात.    

धनश्री वर्मा (Dhanashree verma) ही डान्सर, कोरिओग्राफर आणि डेंटिस्ट आहे. इन्स्टाग्रामवर ती नेहमी तिचे डान्सचे व्हिडिओ पोस्ट करत असते. त्याचसोबत अनेकदा चहल सोबत टूरवर असताना विदेशी खेळाडूसोबत ती थिरकताना दिसते. या व्हिडिओंमुळे ती प्रचंड चर्चेत असते. आता तिच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. धनश्री वर्मा आता एका म्य़ुझिक व्हिडिओत झळकताना दिसणार आहे. 

बॉलिवूडची प्रसिद्ध सिंगर नेहा कक्कर (neha kakkar) लवकरच तिचा नवीन म्युझिक व्हिडिओ घेऊन येणार आहे. या  व्हिडिओवर संध्या तिचे काम सुरु आहे. या तिच्या म्युझिक व्हिडिओत धनश्री वर्मा (Dhanashree verma) दिसणार आहे. नेहा कक्करने इन्स्टाग्रामवर धनश्रीसोबतचा एक फोटो शेअर करून याबाबतची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे धनश्रीच्या चाहत्यांना गुडन्यूज मिळाली आहे. 

पोस्टरमध्ये काय? 
पोस्टरमध्ये नेहाने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. दुसरीकडे, धनश्री गुलाबी रंगाचा को-ऑर्डर सेट परिधान करून हसत आहे. दोघांकडे पाहून ती मुलाच्या खोलीत बसली असल्याचे वाटते. नेहा आणि धनश्री छोट्या खुर्च्यांवर बसल्या आहेत आणि त्यांच्याभोवती खेळणी आणि भेटवस्तू ठेवल्या आहेत. दोघींनी पायात साखळी घातली आहे, ही साखळी त्या फ्लॉंट करत आहेत.

नेहा (neha kakkar) कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी एका राणीची सर्व ऊर्जा घेऊन येत आहे, कारण फक्त मुलांनीच मजा का करावी? ‘ओ सजना’ हे गाणे 19 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. त्यामुळे आमच्याशी कनेक्ट राहा असे तिने म्हटलेय. या तिच्या पोस्टवर धनश्री वर्माने, ‘मी खूप उत्साहित आहे. तू खूप गोंडस दिसत आहेस,अशी प्रतिक्रिया दिली आहे.  

दरम्यान नेहा कक्करच्या (neha kakkar) या म्युझिक व्हिडिओमध्ये धनश्री वर्मासोबत (Dhanashree verma) बिग बॉस फेम अभिनेता प्रियांक शर्मा देखील दिसणार आहे. या गाण्याची चाहत्यांना उत्सुकता लागलीय.  Source link

Leave a Reply