devendra Fadnavis replied To sharad pawar on after alligation on bihar politics spb 94राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बिहामधील राजकीय परिस्थितीबाबत बोलताना भाजपा मित्रपक्षांना संपवते, अशी टीका केली होती. पवारांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “कमी आमदार असतानाही आम्ही शिवसेनाला मुख्यमंत्रीपद दिलं असून मुळात शरद पवार यांचं दुख: जरा वेगळं आहे, ते आपल्याला माहिती आहे”, असे दे म्हणाले.

हेही वाचा – “भाजपा त्यांच्यासोबतच्या मित्रपक्षांना हळूहळू संपवतो, कारण…”, शरद पवारांचा गंभीर आरोप

“शिवसेना हा आमचा मित्रपक्ष आहे. त्यांच्याकडे ५० आमदार आहेत. तर आमच्याकडे ११५ आमदार आहेत. तसेच शिवसेनेला मुख्यमंत्रीपदही दिले आहे. काल त्यांचे नऊ आणि आमचे नऊ असे १८ जणांनी शपथ मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मला असं वाटतं की शरद पवार यांचं दुख: जरा वेगळं आहे, ते आपल्याला माहिती आहे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

हेही वाचा – Maharashtra Cabinet: बच्चू कडू यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, म्हणाले “नाराजी आहेच, त्यांनी शपथ घेऊन…”

शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात चिन्हावरून वाद सुरू आहे. यासंदर्भात बोलताना, मी काँग्रेसमधून बाहेर पडताना, पक्ष आणि चिन्ह दोन्ही बदलले होते, असा टोला भाजपाला लगावला होता. त्यावरूनही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. “ज्यावेळी शरद पवार यांनी पक्ष बदलला त्यावेळी पक्षांतर बंदी कायदा अस्थितवात नव्हता. मात्र, आता तसे कायदे अस्थितवात आहे. त्यामुळे कायदेशीर लढाई लढावी लागते. त्यामुळे ती कायदेशील लढाई एकनाथ शिंदे करत आहेत”, असेही ते म्हणाले.Source link

Leave a Reply