कोविड काळातील कामांवरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे कौतुक केले आहे. कोरोना काळात जेव्हा घरातून बाहेर पडून नको असं सांगण्यात येत होते. तेव्हा राज्यपाल राज्याचा दौरा करत आदिवासी, शोषितांचे प्रश्न समजून घेत होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यपाल भवनात पार पडलेल्या एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
हेही वाचा – शरद पवारांनी राज ठाकरेंच्या मर्मावर ठेवलं बोट; म्हणाले, “हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा…”
नेमकं काय म्हणाले देंवेंद्र फडणवीस?
“राज्यपाल भगत सिंह कोश्यारी तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले. यातली दोन वर्ष कोरोनात गेली. यावेळी घराबाहेर पडू नका, असं सर्वजण सांगत असताना तरीही ते बाहेर निघत होते. तर कधी कधी राज्यपाल भवनातही कार्यक्रम घेत होते. यादरम्यान, राज्यातल्या ३६ जिल्ह्यांत मिळून त्यांनी एकूण १०७७ कार्यक्रम घेतले. राज्यपालांचं व्यक्तीमत्व हे खूप वेगळं आहे. ते जिथेही जातात लोकांना आपलसं करतात”, अशी प्रतिक्रिया देंवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हेही वाचा – “तुमच्या बापाच्या नावावर…”, ‘उद्धव बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय आहे का?’ प्रश्नावरुन सेनेचा हल्लाबोल; माँ साहेबांचाही उल्लेख
“मधल्या काळात सरकारचे प्रमुख मंत्री घराबाहेर निघत नव्हते, तिथे राज्यपाल दौरा करायचे. केवळ दौरेच करत नव्हते, तर तिकडून आल्यानंतर अधिकाऱ्यांनी याबाबत योग्य त्या उपाय योजना करण्याचे निर्देश देत होते. राज्यपाल भवनालाही पहिल्यांदाच असे राज्यपाल लाभले आहेत. जे सकाळ ४ वाजता उठतात. त्यामुळे त्यांच्याकडे काम करण्यासाठी बराच वेळ असतो. या तीन वर्षात राज्यपालांनी ४८ पदवीवितरण समारंभानाही हजेरी लावली आहे. हा एक रेकॉर्ड आहे” , असेही ते म्हणाले.