Headlines

“…देवाजवळ आणखी काय मागावे”, शहाजीबापू पाटलांच्या पत्नीने घेतला ‘एकदम ओके मदी’ उखाणा | sangola MLA shahajibapu patil wife rekhatai patil ukhana latest viral video rmm 97



मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं एकदम ओके मदी हाय” हा डायलॉग प्रचंड व्हायरल होत आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील हे बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आसाममधील गुवाहाटीला गेले होते. यावेळी त्यांनी आपल्या एका कार्यकर्त्यासोबत फोनवरून संवाद साधला. दरम्यान त्यांनी गुवाहाटी येथील स्थितीचं वर्णन “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं एकदम ओके मदी हाय” अशा शब्दात केलं होतं.

त्यांचा हा ऑडिओ कॉल व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या डायलॉगची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू होती. त्यानंतर आता ३ आणि ४ जुलै रोजी विधानसभेत विशेष अधिवेशन पार पडल्यानंतर शहाजीबापू पाटील अखेर १५ दिवसांनी आपल्या मतदारसंघात परत आले आहेत. यानंतर आता त्यांच्या पत्नी रेखाताई पाटील यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांनी आपले पती शहाजीबापू पाटल यांच्यासाठी एक उखाणा घेतला आहे.

उखाणा घेताना त्यांनी म्हटलं की, “असेल तिथे मुलीनं नम्रतेनं वागावे, शहाजीबापूसारखे पती मिळाल्यावर देवाजवळ आणखी काय मागावे.” त्यांचा हा ‘ओके मदी’ घेतलेला उखाणा सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.

दुसरीकडे, शहाजीबापू पाटलांनी मतदारसंघात गेल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “मी माझ्या तालुक्यात आलो आहे. माझ्या तालुक्यातील तमाम जनतेनं एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला भरभरून पाठिंबा दिला आहे. हे जमलेल्या गर्दीवरून लक्षात येत असेल. हा वैचारिक तालुका आहे. गेल्या ५०-६० वर्षांपासून या तालुक्याचं नेतृत्व वैचारिक विचारातून झालं आहे. ही जी भूमिका आहे, ती व्यक्तीगत माझी शहाजीबापू पाटलांची भूमिका नाही, ही माझ्या सांगोला तालुक्यातील जनतेची भूमिका आहे. आम्हाला एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पाहिजे होते. ते आता मुख्यमंत्री झालेत, त्यामुळे मी आनंदी आहे.” असंही ते म्हणाले.



Source link

Leave a Reply