Headlines

संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने 27 सप्टेंबरला भारत बंदची घोषणा

लखनऊ / मुजफ्फरपुर – केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात मागील नऊ महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चा ने रविवारी उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या किसान महापंचायत मध्ये 27 सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. किसान महापंचायत नंतर सत्ताधारी भाजपा सहित वेगवेगळ्या राजकीय पक्षांची प्रतिक्रिया समोर आली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सुरुवातीला 25 सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली होती. परंतु रविवारी झालेल्या मुजफ्फरनगर येथील महापंचायत मध्ये 27 सप्टेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली. 27 सप्टेंबर च्या भारत बंद मध्ये देशातील सर्व काही बंद असेल अशी घोषणा किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

भारतीय किसान युनियन चे प्रवक्ता राकेश टिकैट यांनी महापंचायत ला संबोधित करताना म्हटले की जोपर्यंत तिन्ही कृषी कायदे माघार घेतले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन चालू राहील. ते पुढे म्हणाली की जोपर्यंत आमचा विजय होत नाही तोपर्यंत कोणतीही शक्ती आम्हाला त्या ठिकाणावरुन हटवू शकत नाही.

तीन कृषी कायदे मागे घ्या या मागणीसाठी मागील नऊ महिन्यापासून शेतकरी दिल्ली बॉर्डरवर आंदोलन करत आहेत. किसान महापंचायत वर प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ता अलोक अवस्थी म्हणाले की राकेश टिकैट शेतकरी नाहीत. पंजाब आणि हरियाणामधील राजकीय कार्यकर्त्यांना या कार्यक्रमाला आणण्यात आले होते. संयुक्त किसान मोर्चा केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी शेतकऱ्यांचा उपयोग करुन घेत आहे. वास्तविक पाहता केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कार्य करीत आहे. खरा शेतकरी हा शेतामध्ये राबतो आहे. तो कोणत्याही आंदोलनामध्ये भाग घेत नाही. याचा परिणाम असा आहे की राज्यात वेगवेगळ्या अन्नधान्याचे भरपूर उत्पादन झाले आहे.

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी किसान महापंचायत ला संबोधित करताना म्हटले की शेतकऱ्यांच्या अस्तित्वाच्या मुद्द्यांना दुर्लक्षित करून हे लोक हिंदुत्वाच्या नावावर लोकांमध्ये अंधत्व पसरवत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *