Headlines

deputy cm devendra fadnavis mocks opposition leader ajit pawar ncp

[ad_1]

गेल्या अडीच वर्षात राज्याच अनेक राजकीय घडामोडी, सत्तानाट्य पाहायला मिळाली आहेत. आधी शिवसेना-भाजपाची तुटलेली युती, त्यानंतर देवेंद्र फडणवीस-अजित पवारांचा अनपेक्षित शपथविधी, फडणवीसांचं कोसळलेलं सरकार, महाविकास आघाडीची सत्तास्थापना ते थेट गेल्या महिन्याभरात प्रचंड उलथापालथींनंतर शिंदे गट आणि भाजपाचं आलेलं सरकार. या पूर्ण काळात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ शपथविधीवरून टोलेबाजी झालेली अनेकदा पाहायला मिळाली आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये होणारा कलगीतुरा कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. आताही देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना लगावलेल्या टोल्यावरून असाच कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे सरकारने अगदी शेवटच्या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावं बदलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर आलेल्या नवीन सरकारकडून हे निर्णय फिरवले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यासंदर्भात आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. त्यानुसार, औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद शहराला धाराशिव तर नवी मुंबई विमानतळाला नाव लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असं नाव देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी मंत्रीमंडळ विस्तारावरून विरोधकांनी केलेल्या टीकेला या दोघांनी प्रत्युत्तर दिलं.

अजित पवारांची टीका

अजित पवारांनी केलेल्या टीकेला या दोघांनी यावेळी खोचक शब्दांत उत्तर दिलं. “राज्यात ३६ जिल्हे आहेत. त्या सर्व ठिकाणी काम सुरू झाले असते. मात्र, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दोघेच मालक झाले आहेत. मंत्रीमंडळाचा विस्तार करून बाकीच्या आमदारांना का सामावून घेतले जात नाहीत? मंत्रीमंडळात आणखी ४० जण घेता येऊ शकतात. मात्र, त्यांची वर्णी लागताना दिसत नाही”, असं म्हणत नेमकं मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

“कुठंतरी पाणी मुरतंय…नक्कीच काहीतरी गडबड आहे” – अजित पवारांची सूचक टिप्पणी

“त्यांना विरोध करायचाच असतो”

दरम्यान, अजित पवारांच्या या टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी टोला लगावला. “निर्णय कुठेही थांबलेले नाहीत. मंत्रीमंडळ काय, लवकरच होईल. त्यात अडचण काहीच नाहीये. विरोधी पक्षनेत्याला विरोध करायचाच असतो”, असं शिंदे म्हणाले.

‘डेडलाईन’वरून फडणवीसांचा टोला!

अजित पवारांच्या टीकेला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिलं. “त्यांची लाईन डेड आहे. म्हणून त्यांना डेडलाईन हवीये. पण चिंता करू नका, लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल”, असं फडणवीस यावेळी म्हणले.

संजय राऊतांच्या ‘एक दूजे के लिए’ टीकेवर एकनाथ शिंदेंचा टोला; म्हणाले, “अरे बाबा आता…!”

“थेट नगराध्यक्ष वा सरपंचाची निवडणूक झाली, तर नंतर पैशाची खेळी करता येत नाही. म्हणून त्यांनी तो निर्णय बदलला. पण आम्ही तो निर्णय पुन्हा फिरवला आहे. जवळजवळ सगळ्या राज्यांमध्ये सरपंच आणि नगराध्यक्षांच्या निवडणुका थेट होतात. काही राज्यांत तर महापौरांची निवडणूक देखील थेट होते. त्यामुळे अजित पवारांना पराभव समोर दिसतोय म्हणून ते तसं बोलत आहेत”, असं देखील फडणवीस म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *