Headlines

अंगावर टेम्पो घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या वाळू तस्करावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

बार्शी /प्रतिंनिधी – सासुरे येथील नागझरी नदी पात्रातील अनधिकृत वाळू चोरीचा पंचनामा करून तस्करावर कारवाई करण्यात यावी.तसेच वाळू चोरीस विरोध केल्यामुळे अंगावर टेम्पो घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या वाळू तस्करावर गुन्हा दाखल करण्याची मागणी बालाजी आवारे यांनी तहसिलदार बार्शी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की आज रोजी दि. २९/१०/२०२१ वेळ रात्री १.३० वाजता माझी मोटार का चालू झाली नाही ? हे पाहण्यासाठी गेलो असता माझ्या गाडीचा उजेड पाहून जोतीबा गोपीनाथ करंडे व राजकुमार गोपीनाथ करंडे व इतर ७ शिवराज दिलीप पाटील, अक्षय विनायक दळवी. सागर दिलीप सांडभोर, संतोष दत्तात्रय दळवी. शंकर आदिनाथ दळवी विश्वास दत्तात्रय दळवी, अनिल दत्तात्रय सातपुत यांनी माझ्या अंगावर बाळूचा डेम्पो घालून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.


परंतु मी माझी गाड़ी शेजारील नालीत घातल्यामुळे त्यांचा मला जीवे मारण्याचा प्रयत्न फसला व तेथून गाडी भरधाव वेगाने पळवून नेताना श्री म्हन्कालेश्वर मंदिरासमोरील रंगमंचाच्या शेजारील गाळात फसला. मी धाडसाने जाऊन सदर ठिकाणी डेम्पोचे व वाळू तस्कराच माझ्या मोबाईल मधील नोट कॅम मध्ये वाळू तस्करांचे फोटो व व्हिडिओ काढला आहे. या पूर्वीही सदर दोघा बंधूंना व त्यांना वाळू भरण्यास मदत करणाऱ्या साथीदारास समज देऊन देखील ते पुन्हा पुन्हा सदर ठिकाणची बाळू चोरी करत आहेत, नजरेस येऊ नये म्हणून व वाळू चोरी केली दिसू नये म्हणून वाहत्या पाण्यातील वाळू रोज १५ ब्रास असे करून त्यांनी सदर ठिकाणाहून १००० ते १५०० ब्रास वाळू चोरी केलेली आहे. सदर बाब वारंवार तलाठी , ग्रामसेक, सरपंच पोलीस पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. यापूर्वी आमची आत्या भामाबाई निवृत्ती दळवी यांना देखील घरी जाऊन धक्काबुकी केली होती. तशी त्यांनी लेखी तक्रार वैराग पोलीस स्टेशनला दिली आहे.


त्यांनी मला मागील दोन तीन महिन्याखाली वैराग वरून गावाकडे येताना कॅनोल वर मला व माझा मित्र रामचंद्र करंडे यांना वाटेत अडवून तू आम्हाला वाळू चोरीस विरोध करशील तर तुझे हात पाय तोडू व तुला डेम्पोची धडक देऊन जीवे मारण्याची धमकी दिली होती. रात्री केलेल्या प्रकारा पासून व सकाळी रामचंद्र करंडे यांच्या किरणा दुकानं समोर तू रात्री आमच्या तावडीतून वाचला म्हणून माझ्या अंगावर दगड – गोटे घेऊन सरपंच व पोलीस पाटील यांच्या समक्ष माझ्या अंगावर धावून येऊन जावे मारण्याची धमकी दिली . मला कसाई म्हणतात तुझ नरड केव्हा सोडवू हे तुला देखील समजणार नाही अशी धमकी दिली आहे. तेव्हा जोतीबा करंडे व राजकुमार करंडे या वाळू तस्कारापासून माझ्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. माझ्या रक्षणासाठी व दोषी वर कारवाई होण्यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करावी.

या आशयायचे निवेदन बालाजी आवारे अध्यक्ष ,नागझरी नदी पाणलोट विकास समिती यांनी नायब तहसिलदार संजीवन मुंढे यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *