दीपिकाचा इंटीमेट व्हिडीओ व्हायरल, पाहणाऱ्यांची काय अवस्था पाहा


मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या सौंदर्यावर सगळेच भाळले आहेत. दीपिका आणि स्मितहास्याबाबत जितकं बोलावं तितकं कमी. इतकंच काय, तर हीच दीपिका जेव्हा मादक अंदाजात समोर येते तेव्हाही भल्याभल्या अभिनेत्रींना मागे टाकते. (Deepika Padukone Video)

अभिनेता रणवीर सिंगची पत्नी आणि आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असणारी हीच दीपिका सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. 

सहकलाकारांसोबत ती बऱ्याच कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहे. अशा या बॉलिवूड अभिनेत्रीचा एक इंटिमेट व्हिडीओ सध्या बराच व्हायरल होत आहे. 

व्हिडीओमध्ये दीपिका बऱ्याच बोल्ड अंदाजात दिसत आहे. मुख्य म्हणजे इथं तिच्यासोबत दिसणारा ‘तो’ रणवीर नाही. तर त्याच्यासोबतच झळकलेला एक अभिनेता आहे. 

आता तुम्ही म्हणाल इतकी चर्चा होतेय तो व्हिडीओ नेमका आहे तरी काय? 

तर, शकुन बत्रा दिग्दर्शित ‘गहराईयाँ’ Gehraiyaan या चित्रपटातील एका गाण्याचा हा व्हिडीओ. ‘बेकाबू’ असे या गाण्याचे बोल. 

दीपिका आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीवर गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. यामध्ये या दोन्ही कलाकारांमधील इंटिमेट दृश्य आणि त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. 

प्रेमात आकंठ बुडालेल्या युगुलांच्या भूमिकेत असणारी ही जोडी सध्या भलतीच चर्चेत आली आहे. कारण ठरतेय ती म्हणजे त्यांची केमिस्ट्री. 

युट्यूबवर या गाण्याला चांगली व्ह्यूअरशिप मिळताना दिसत आहे. चित्रपटातील मागील काही गाण्यांप्रमाणेच आता हे गाणंही गाजताना दिसत आहे. Source link

Leave a Reply