Headlines

deepak keserkar reaction on mumbai highcourt decision on dasara melava spb 94

[ad_1]

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाल्यानंतर या वादावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळाल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. जिथे बाळासाहेबांचे विचार असतील, तिथे शिवसैनिक ऐकायला जातील, असे ते म्हणाले.

हेही वाचा – उच्च न्यायालयाकडून शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला परवानगी; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

काय म्हणाले दीपक केसरकर?

“शिंदे गटाचा मेळावा निश्चितपणे होणार आहे. को कुठे होणार याबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. मात्र, औरंगाबाद आणि जळगावमध्ये झालेला मेळावा बघितला. तर लाखोंच्या संखेने जनता येथे आली होती. कारण बाळासाहेबांच्या विचारांसाठी केवळ एकनाथ शिंदे यांनी लढा दिला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करणे हे बाळासाहेबांना कधीही आवडले नसते. जर उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाच्या विचारवर कायम असतील तर त्यांनी दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेली युती तोडली असल्याचे जाहीर करावे”, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे.

हेही वाचा – दसरा मेळाव्याला परवानगी मिळ्यानंतर आदित्य ठाकरेंची चार ओळीत प्रतिक्रिया, म्हणाले, “विजयदशमी…”

“आजच्या निकालात आमच्यासाठी धक्कादायक असं काहीही नाही. जर मुळ शिवसेना कोणत्या गटाची आहे, याचा निकाल आज झाला असता, तर हे धक्कादायक असतं. या निकालातून जे लोक वेगवेगळे अर्थ काढत आहेत, ते अत्यंत चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयात असलेल्या प्रलंबित याचिकेचा आणि आजच्या निर्णयचा काहीही संबंध नाही. कारण त्याबाबतचा उल्लेख आजच्या निकालपत्रामध्ये आलेला नाही. जर शिवसेनेचा मेळावा दोन ठिकाणी होणार असेल, तर जिथे बाळासाहेबांचे विचार असतील, तिथे लोक ऐकायला जातील”, असेही ते म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *