दिपक केसरकरांची भेट घेतल्यानंतर उदयनराजेंनी सांगितलं कारण, म्हणाले… | Udayanraje Bhosale comment on Shinde Fadnavis Government cabinet expansion msr 87खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यात कॅबिनेटमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली, त्यात प्रामुख्याने जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरच्या विकासाबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. उदयनराजेंच्या या भेटीमुळे व पर्यटन विकासाच्या चर्चांमुळे मंत्रीमंडळ खातेवाटपा अगोदरच दिपक केसकरांकडे पर्यटन खाते जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

केसरकरांची भेट घेतल्यानंतर उदयनराजेंनी सांगितले की, दीपक केसकर यांची मी पुण्यात भेट घेतली. वेगवेगळ्या विकास कामांच्या संदर्भात चर्चा झाली. आपण जर पाहीलं तर, जागतिक पातळीवर प्रसिद्धि असलेलं महाराष्ट्रातील एकमेव थंड हवेचं ठिकाण जर कुठलं असेल तर ते महाबळेश्वर आहे. या ठिकाणी वर्षाकाठी जवळपास ५० लाख पर्यटक येतात. त्यात आणखी भर कशी पाडता येतील, आणखी काय उपाययोजना करता येतील. पर्यटनाच्या माध्यामातून लोकांना कसा रोजगार उपलब्ध करता येईल? यावर चर्चा झाली.

हेही वाचा : “…मग मी शिवसेना माझी आहे असं म्हणायचं का?”, उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

तसेच, आमची सदिच्छा भेट होती. पहिल्यापासून संबंध आहेत. त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पर्यटन खातं आता केसरकरांकडे जाणार का? एक लक्षात घ्या खातं कोणाकडे जातं हे महत्त्वाचं नाही. शेवटी तो एक भाग आहे आणि त्याचा विकास करताना तिथले स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग पाहिजे. असंही उदयनराजेंनी यावेळी सांगितलं.Source link

Leave a Reply