Headlines

Deepak Kesarkar was angry over Kirit Somaiya criticism of Uddhav Thackeray abn 97

[ad_1]

शिवेसेनेतून बंड करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने राज्यात सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदारांसह बंड करुन एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत आणि देवेंद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री आहेत. मात्र भाजपा नेत्यांकडून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे टीका करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्या यांनी माफिया मुख्यमंत्र्यांना हटवल्याबद्दल अभिनंदन असे ट्विट केले आहे. यानंतर शिदें गटात गेलेले शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन आज पदभार स्वीकारला. त्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्या मुलासह एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. या भेटीचा फोटो सोमय्या यांनी ट्विट करत, “मंत्रालयात आज ‘रिक्षावाला’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्र्यांना हटवल्याबद्दल अभिनंदन केले,” असे म्हटले आहे.

मी एकनाथ शिंदेंना भेटून त्यांचे अभिनंदन केले. याआधीच्या सरकारमधील लोकांच्या डोक्यात सत्तेचा माज गेला होता. त्याचा जो दुरुपयोग सुरु होता ती एक प्रकारची माफियागिरी होती. मनुसख हिरेनची हत्या करण्यात आली. त्यामुळे त्याच्या घरचे त्यांना माफियाच म्हणणार आहेत. माझ्यावर २२ आरोप केले गेले त्यातील एक खरा निघाला नाही. मुख्यमंत्र्यांनी किरीट सोमय्यांविषयी कोणती भाषा वापरली होती, असे स्पष्टीकरण किरीट सोमय्या यांनी दिले आहे.

यानंतर दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुखातीमध्ये बोलताना दीपक केसरकर यांनी याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणार असल्याचे म्हटले आहे.

“ज्यावेळी आम्ही सर्व मुंबईत परत आलो त्यावेळी भाजपाचे सर्व नेते आणि आमदार यांच्यासोबत बैठक झाली. देवेंद्र फडणवीस त्यावेळी बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी मी बोलताना आमचे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात कोणतेही वक्तव्य करण्यात येऊ नये असे म्हटले होते. त्यांनी माझी विनंती मान्य केली होती. देवेंद्र फडणवीस यांनीही आमच्या समोर भाजपा नेत्यांना सांगितले होते की, राजकीय वाद होत असतात पण कोणत्याही जेष्ठ नेत्याबद्दल वक्तव्य करायचे नाही. मी देवेंद्र फडणवीसांना हे सांगितलेले आहे. त्यांना भेटल्यानंतर आम्ही याबाबत बोलू आणि दोघांमध्ये जे काही ठरले आहे त्याची अंमलबजावणी व्हावी याची विनंती करु. किरीट सोमय्यासोबत देवेंद्र फडणवीस बोलू शकतात. हे असे घडता कामा नये. असे कोणालाच आवडणार नाही,” असे दीपक केसरकर यांनी म्हटले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *