Headlines

deepak kesarkar replied to aditya thackeray alligation on vedanta spb 94

[ad_1]

वेदान्ताने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातला स्थलांतर केल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत त्यांनी शिवसेनेबरोबरच महाराष्ट्राशी गद्दारी केल्याचा आरोप केला होता. त्याला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही मंत्री असताना गुंतवणूक घेऊन आलेल्या शिष्टमंडळाला भेटतही नव्हता, असा आरोप त्यांनी आदित्य ठाकरेंवर केला आहे.

हेही वाचा – २६ जुलैला CM शिंदेंनी पाठवलेलं ‘वेदान्त’च्या मालकांना पत्र; केंद्र सरकारचा उल्लेख असणाऱ्या दोन मोठ्या मागण्यांबद्दल पहिल्यांदाच खुलासा

काय म्हणाले दीपक केसरकर?

“जल्लोष कोणीही करू शकतं, जल्लोष आणि मतदार यांच्यात फार मोठा फरक असतो. जो त्यांनी समजून घेतला पाहिजे. ते तरुण नेते आहेत. तुम्ही मंत्री असताना काय केलं, हे तुम्ही महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे. गद्दार, खोके हे सांगण्यासाठी राजकीय नेते नसतात. जनतेच्या भावनांवर राज्य करण्याची वेळ आता निघून गेली आहे. आता मंत्री म्हणून काय काम करतो, हे जनतेला माहिती पडतं. त्यामुळे खोटं बोलल्यापेक्षा तुम्ही काय केलं हे तुम्ही जनतेला सांगितले पाहिजे”, अशी प्रतिक्रिया दिपक केसरकर यांनी दिली आहे.

हेही वाचा – VIDEO : “नुसती गुजरातच्या विरोधात भाषणं देऊन गुजरातला हरवता येत नाही, त्यासाठी…”; फडणवीसांचा विरोधकांना टोला!

“मला आदित्य ठाकरेंबाबत आदर आणि प्रेम आहे. मात्र, आज ते ज्या प्रकारे राजकारण करत आहे, ते पाहिलं तर आमच्यासारख्या माणसांना बोलावं लागतं. वस्तूस्थिती जनतेला सांगावी लागते. ज्यावेळी तुम्ही राजकारणात गुंतवणूक येण्याचा गोष्टी करता, तेव्हा तुम्ही मंत्री असताना हजारो कोटी गुंतवणूक घेऊन आलेल्या शिष्टमंडळाला तुम्ही साधी भेटही देत नाहीत. ही तुमची संस्कृती आहे. हे सर्व महाराष्ट्राच्या जनतेला माहिती झाली पाहिजे. तुम्ही जेंव्हा खोट सांगत फिरता, तेव्हा आमच्या सारख्यांना बोलावं लागतं. त्यामुळे तुम्ही आता भावनेचं राजकारण केल्यापेक्षा तुम्ही मंत्री म्हणून काय केलं, तरुणांच्या रोजगारासाठी काय केलं, तुम्ही कंपन्यांच्या शिष्टमंडळाला का भेटत नव्हता, हे सांगायला हवं”, असंही ते म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *