December 2022 Rashi Parivartan: डिसेंबर महिन्यात बुध, शुक्र आणि सूर्य गोचरमुळे फळफळणार 4 राशींचं नशीब


December 2022 Planetary Transit: ज्योतिषविद्येमध्ये (Astrology) सांगण्यात आल्यानुसार दर महिन्यात कोणता न कोणता ग्रह हा त्याच्या मूळ राशीमध्ये प्रवेश करतो. या गोचरचा (Effects og gochar) परिणाम मात्र सर्व अर्थात 12 राशींवर होत असतो. या परिणांमांमुळे कोणाचं नशीब फळफळतं, तर कोणा एका राशीच्या व्यक्तींना सावधगिरीनं रहावं लागतं. पुढच्या महिन्याचं म्हणजेच डिसेंबर महिन्याचं म्हणाल तर, 3 मोठे आणि तितकेच महत्त्वाचे ग्रह गोचर करणार आहेत. हे ग्रह म्हणजे बुध, शुक्र आणि सूर्य  (December Planetary Transit).

सूर्य एकदाच करणार गोचर 

डिसेंबर महिन्यात सूर्य फक्त एकदाच गोचर करणार आहे (Sun Transit In December 2022). तर, बुध आणि शुक्र 2 वेळा राशींमध्ये परिवर्तन करणार आहेत (Budh And Shukra Transit In December 2022).  या तिघांमुळे 4 राशींना धनलाभ मिळण्यासोबतच त्यांच्या आयुष्यात आनंदवार्तांची बरसात होणार आहे. 

सिंह रास (Leo)

या राशीसाठी डिसेंबरमध्ये होणारा प्रत्येक गोचर फायद्याच्या असेल. जुन्या व्यवहारांना मार्गी लावता येणआर आहे. चांगला परतावा मिळून अनपेक्षित धनलाभाचा योग आहे. परदेश यात्रा करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. 

कर्क रास (Cancer)

राजकारणामध्ये सक्रिय असणाऱ्यांसाठी डिसेंबर महिना महत्त्वाचा असणार आहे. एखादी मोठी जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. तुमच्याप्रती समाजात असणारी आदराची भावना वाढेल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी पुढाकार घ्याल. 

तुळ रास (Libra )

कामाच्या निमित्त एके ठिकाणी फिरण्यासाठी जाण्याचे बेत आखाल. तुमचा संपूर्ण महिना आनंददायी असेल. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. आरोग्य निरोगी राहील. व्यवसायामध्ये फायदाच फायदा मिळणार आहे. कुटुंबीयांची साथ मिळणार आहे. 

मेष रास (Aries)

सूर्याच्या प्रभावामुळं तुमच्यावर असणारं आजारपणाचं सावट दूर जाणार आहे. नोकरी शोधणाऱ्यांसाठी एखादी चांगली संधी चालून येणार आहे. व्यवसायामध्ये अनेक चांगले आणि उत्तमोत्तम व्यवहार तुम्हाला करता येणार आहेत. न्यायालयीन प्रकरणं निकाली निघणार आहेत. 

(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)Source link

Leave a Reply