Dasara Melava: ‘उद्धव यांचं आमंत्रण आल्यास मेळाव्याला जाणार’ म्हणणाऱ्या राणेंना सेनेचं उत्तर; म्हणाले, “उद्या संध्याकाळपर्यंत…” | Dasara Melava Shivsena reply Narayan Rane over his comment of attending function if Uddhav Thackeray invite scsg 91



भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आमंत्रण मिळालं तर आपण शिवाजी पार्कवरील उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाईन असं म्हटलं होतं. नारायण राणेंच्या या विधानावर शिवसेनेनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या विधानावर भाष्य केलं आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणेंना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. “आमंत्रण आलं तर सहभागी होणार. कोणीही आमंत्रण दिलं तर जाणार. उद्धव ठाकरेंनी आमंत्रण दिलं तरी जाणार,” असं राणेंनी हसत म्हटलं होतं. त्यावर पत्रकारांनी हसतच, “उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला पण जाणार?” असा प्रश्न विचारला. त्यावर राणेंनी, “आमंत्रण दिलं पाहिजे. पण मला माहिती आहे देणार नाही,” असं म्हटलं.

“उद्धव ठाकरेंनी आमंत्रण दिलं तर दसरा मेळाव्याला येईल असं खोचक विधान नारायण राणेंनी केलं आहे,” असं म्हणत निलम गोऱ्हेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला. “बघू उद्या संध्याकाळपर्यंत काय होतंय ते,” असं निलम गोऱ्हे म्हणाल्या. “ठाकरे देतील त्यांना देतील का आमंत्रण?” असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना निलम गोऱ्हेंनी हसतच, “त्यांना उत्तर चांगलं माहित आहे की त्यांची कायमची हकालपट्टी केलेली आहे. तरी ते बोलत आहेत तर त्यांच्या मनामध्ये कुठेतरी दुगदुगी शिल्लक आहे असं दिसतंय,” असं उत्तर दिलं.



Source link

Leave a Reply