Headlines

Darlings च्या Release नंतर आलिया भट्टला मोठा धक्का, Netflix शी झालेली ‘ती’ डील…

[ad_1]

मुंबई : स्त्रीयांच्या रोजच्या जीवनाभोवती फिरणारा, महिलांच्या व्यथा मांडणारा अभिनेत्री आलिया भट्टचा Darlings सिनेमा नुकताच Netflix वर प्रदर्शित झाला.  महत्त्वाचं म्हणजे सध्या रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांची परिस्थिती पाहता आलियाने Darlings ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला. आलियाला तिच्या या निर्णयाचा मोठा फायदा देखील झाला. एवढंच नाही तर Darlings सिनेमातून आलियाने तगडी कमाई देखील केली आहे. आलिया भट्ट स्टारर Darlings सिनेमा सध्या नवे विक्रम रचत आहे. 

सिनेमात पतीच्या जाचाला कंटाळलेल्या पत्नीच्या भूमिकेला आलियाने योग्य न्याय दिल्या. तर शेफाली शाह यांनी साकारलेल्या निडर आईच्या भूमिकेची सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. निर्मात्यांनी सिनेमा ओटीटीवर प्रर्शित करुन तगडी कमाई केली आहे. 

ई-टाइम्सच्या वृत्तानुसार,  आलिया भट्टचा सिनेमा निर्मात्यांनी नेटफ्लिक्सला 80 कोटी रुपयांना विकलं आहे. या वर्षी बॉक्स ऑफिसवर अनेक मोठे सिनेमे प्रदर्शित झाले, ज्यांना 50 कोटींचा आकडा गाठणे कठीण झाले. त्यामुळे सिनेमाच्या यशाचा आलिया सुखद धक्का बसला आहे.. असं म्हणायला हरकत नाही. 

दरम्यान, अक्षय कुमारचे ‘बच्चन पांडे’ आणि ‘सम्राट पृथ्वीराज’ हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले होते. त्यापैकी ‘बच्चन पांडे’ 50 कोटींचा टप्पा पार करू शकला नाही. तर दुसरीकडे, ‘सम्राट पृथ्वीराज’ने फक्त 75 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. तर दुसरीकडे आलियाच्या पहिल्या होम प्रॉडक्शन डार्लिंग्सने या दोन्ही चित्रपटांपेक्षा चांगली कमाई केली.

याआधी आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावडी’ सिनेमाने देखील मोठी कमाई केली. ‘गंगूबाई काठियावडी’ सिनेमाने भारतात बॉक्स ऑफिसवर जवळपास 132 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. 

‘गंगूबाई काठियावडी’ आणि ‘डार्लिंग्स’नंतर आलियाचा आगामी सिनेमा ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर काय जादू दाखवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकिकडे आलियाचे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत, तर दुसरीकडे रणबीरच्या ‘शमशेरा’ सिनेमांला अपयशाचा सामना करावा लागत आहे. 

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *