Headlines

दानवे म्हणाले मनसे ‘भाजपाची दुसरी शाखा’; आता संदीप देशपांडेंचे जशास तसे उत्तर; “शरद पवार यांच्या पिंजऱ्यामधील…” | sandeep deshpande criticizes ambadas danve over comments on raj thackeray and mns

[ad_1]

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यात ते मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते पक्षविस्तार आणि पक्षबांधणीसाठी वेगवेगळे निर्णयही घेत आहेत. दरम्यान, मनसे पक्ष भाजपाचा मित्र होऊ पाहत आहे. राज ठाकरे यांचा पक्ष भाजपाची दुसरी शाखा आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. शिवसेना ही शरद पवार यांच्या पिंजऱ्यातील मांजर आहे. राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत आहे, त्याबद्दल शिवसेना काही बोलणार का? असा सवाल देशपांडे यांनी केला आहे. ‘टीव्ही ९ मराठी’ने तसे वृत्त दिले आहे.

हेही वाचा >>> “भाजपाची दुसरी शाखा राज ठाकरेंचा…”, अंबादास दानवेंचा टोला; म्हणाले, “भाषा, वर्तन मिळते जुळते”

यांच्या (उद्धव ठाकरे गट) पायाखालची वाळू सरकली आहे. हे आम्हाला भाजपाची शाखा म्हणत आहेत. आपण स्वत: कोण आहोत हे एकदा शिवसेनेने पाहावे. शिवसेना शरद पवार यांच्या प्राणीसंग्रहालयातील पिंजऱ्यामधील मांजर झाली आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले. शिवसेनेचे संभाजीनगरमधील नेतृत्व खूप जुने झाले आहे. आम्ही आमचा पक्ष वाढवत आहोत. मात्र राष्ट्रवादी शिवसेना संपवत आहे, त्याचं काय? असा सवालही संदीप देशपांडे यांनी केलाय.

हेही वाचा >>> “काँग्रेस, शिवसेनेसोबत युती करण्यास…”, प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली इच्छा; म्हणाले…

अंबादास दानवे काय म्हणाले होते?

अंबादास दानवे यांनी मनसे तसेच राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणून फिरत होते. तीन-चार महिन्यांपूर्वी त्यांनी भोंग्याचा विषय काढला होता. जिथे भोंगे असतील तिथे हनुमान चालीसा लावणार होते. मात्र, एकाही भोंग्यासमोर हनुमान चालीसा म्हटली गेली नाही, असे अंबादास दानवे म्हणाले.

हेही वाचा >>> “रामदास कदमांनी राज्यात कुठेही फिरावे, त्यांना..,” शिवसेनेच्या महिला नेत्यांनी दिला इशारा

राज ठाकरे महाविकास आघाडी आणि शिवसेनेला जाणीवपूर्वक विरोध करत होते. भाजपाचे ते मित्र होऊ पाहत आहेत. त्यांची भाषा, वर्तन भाजपाशी मिळते-जुळते आहे. भाजपाचे लोक त्यांना भेटतात. ते भाजपाच्या लोकांकडे जातात. राज ठाकरेंचा मनसे पक्ष म्हणजे भाजपाची दुसरी शाखा आहे, असा टोला अंबादास दानवे यांनी राज ठाकरेंना लगावला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *