डान्स प्रॅक्टिस करताना थोडक्यात बचावली अभिनेत्री… Video व्हायरल


Rubina Dilaik Viral Video:  टेलिव्हिजन अभिनेत्रींना आपण नेहमीच फोलो करतो. त्यातून बिग बॉसच्या अभिनेत्री या विशेष चर्चेत राहतात. त्यातील एक अभिनेत्री सध्या चांगली फेमस आहे. त्यातून तिच्या सध्याच्या खतरों के खिलाडी या शोमुळे ती सध्या चांगलीच प्रसिद्ध आहे. (big boss fame actress rubina dilaik fall down while practising dance steps video goes viral)

रुबिना दिलीक ही टीव्हीवरच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘छोटी बहू’ म्हणून तिने घराघरात आपला ठसा उमटवला आहे. सध्या ती ‘झलक दिखला जा 10’ च्या मंचावर दिसत आहे. रुबिना तिच्या परफेक्ट स्टाईलिंगसाठीही ओळखली जाते. डान्स रिएलिटी शोमध्येही तिनं सहभाग घेतला होता. 

रुबिनाचा डान्स रिहर्सलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. तो पाहून कदाचित तुम्हाला धक्का बसेल. ती एरियल स्टंटचा सराव करत होती. तेव्हाच तो मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली. 

रिहर्सलचा हा व्हिडिओ खुद्द रुबिनाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ती ‘झलक दिखला जा 10’साठी एरियल स्टंट करताना दिसत आहे. त्यानंतर खाली उतरताना तिचा तोल सुटला आणि ती पडली. परिक्षक तिथं होते म्हणून त्यांनी तिला सांभाळलं नाहीतर मोठं संकट रूबीनावर ओढवलं असतं. 

थोडीशी चूक रुबीनाला महागात पडू शकते, हे व्हिडिओ पाहून स्पष्ट होते. इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना युझर्ननी तिला ट्रोलही केले आहे. असं असलं तरी रुबिना वाचल्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते देवाचे आभार मानत आहेत. यासोबतच त्यांना खबरदारी घेण्याचा सल्लाही देत ​​आहेत.

रुबिना दिलीकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नुकतीच ती रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमध्येही दिसली होती. अशा परिस्थितीत त्यांना स्टंट करण्याचा खूप सराव झाला असावा. तरीही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.Source link

Leave a Reply