CSK विरुद्ध सामन्यात मुंबईच्या युवा खेळाडूने का जोडले हात?


मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 59 वा सामना चेन्नई विरुद्ध मुंबई खेळवण्यात आला होता. या सामन्यात मुंबईने विजय मिळवत चेन्नईला मोठा धक्का दिला. चेन्नईही मुंबई पाठोपाठ प्लेऑफच्या रेसमधून बाहेर झाली आहे. या सामन्यात मुंबईचा खेळाडू हात जोडून उभा असल्याचं दिसलं. सोशल मीडियावर त्याचा फोटो खूप व्हायरल होत आहे. 

मुंबईच्या खेळाडूने नक्की हात कोणाला जोडले. मैदानात नेमकं काय घडलं यामागचं मोठं कारण समोर आलं आहे. या फोटोची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. 

मुंबई इंडियन्सच्या विजयाचा खरा हिरो 19 वर्षांचा युवा खेळाडू टिळक वर्मा आहे. या टिळक वर्माने मुंबई टीमकडून 34 धावा केल्या. टिळक वर्मा यावेळी हात जोडून नमस्कार करताना दिसला. 

टिळक वर्मा त्याचे कोच सलाम बयाश यांना हात जोडत असल्याची माहिती मिळाली आहे. टिळकचे कोच मैदानात मॅच पाहायला आले होते. त्यावेळी कोच बयाश यांना टिळक वर्माने नमस्कार केला आहे. 

टिळक वर्मा पहिल्याच हंगामात सुपरस्टार बनला. पंधराव्या हंगामात मुंबईकडून तो सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू ठरला. त्याला टीम इंडियात संधी मिळणार असल्याचे संकेतही रोहित शर्माने दिले. 19 वर्षांच्या युवा फलंदाजाने 12 सामन्यात 386 धावा केल्या आहेत. 

टिळक वर्माचं रोहित शर्माने खूप कौतुक केलं आहे. तो चांगली बॅटिंग करतो त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले असल्याचे संकेतही रोहितने दिले आहेत. 19 व्या वर्षी तो कोट्यवधींच्या खेळाडूंच्या तोडीसतोड कामगिरी करताना दिसत आहे. Source link

Leave a Reply