CSK vs KKR: मोईन अलीच्या जागी जडेजा ‘या’ खेळाडूला देणार प्लेईंग 11 मध्ये संधी


मुंबई : क्रिकेट चाहत्यांना हवा असलेला दिवस आज अखेर उजाडला आहे. आजपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. आजपासून 29 मे पर्यंत चाहते आयपीएलचा फिवर पहायला मिळणार आहे. आज चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यात चेन्नईचा स्टार खेळाडू मोईन अली खेळू शकणार नाहीये. तर मोईन अलीच्या जागी टीममध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा स्टार ऑलराऊंडर मोईन अलीच्या जागी ड्वेन ब्रावोला संधी मिळण्याची शक्यता आहे. नवा कर्णधार रवींद्र जडेजा हा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ड्वेन ब्रावो धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यामुळे टीमला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. 

दुसरीकडे ड्वेन ब्रावो गोलंदाजीही करू शकतो. तो त्याच्या ओव्हरमध्ये समोरच्या टीमला फार कमी रन्स देतो. डेथ ओव्हर्समध्ये त्याची गोलंदाजी पाहण्यासारखी असते. त्याचप्रमाणे फिल्डींगमध्ही त्याचा हात कोणी धरू शकत नाही. 

आयपीएलच्या स्टार ऑलराऊंडर्समध्ये ड्वेन ब्रावोची गणना केली जाते. ड्वेन ब्रावोने आतापर्यंत 151 सामन्यांमध्ये 167 विकेट्स काढले आहेत. यावेळी त्याने 1537 रन्सही केले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये कर्णधार रविंद्र जडेजा ब्रावोला टीममध्ये सामील करू शकतो. 

चेन्नई सुपर किंग्सची संभावित प्लेइंग इलेव्हन 

डेवोन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड़, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन ब्रावो, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगरगेकर आणि एडम मिल्ने.Source link

Leave a Reply