Headlines

बार्शीच्या मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात फौजदारी नोटिसा

बार्शी – बार्शीतील रस्ते व गटारीच्या दुरवस्थेमुळे स्वच्छतेचे अनेक प्रश्न सातत्याने निर्माण झाले आहे.मागील तीन वर्षापासून खड्डेमय रस्ते, गलिच्छपणा, अस्वच्छता या विरोधात सामाजिक कार्यकर्ते मनीष देशपांडे व दीनानाथ काटकर यांनी मोठा कायदेविषयक लढा उभा केला आहे.शक्य त्या कायदेशीर मार्गाचा वापर करून त्यांनी बार्शीतील खड्डे व अनियोजित गटार या विरोधात विविध तक्रारी तसेच न्यायालयात याचिका दाखल केल्या,अशाच एका तक्रारीची दखल घेत बार्शी चे कार्यकारी दंडाधिकारी सुनील शेरखाने यांनी बार्शीचे नगरपरिषद च्या मुख्याधिकारी व बार्शी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याविरुद्ध फौजदारी नोटिसा 25 ऑक्टोबर रोजी जारी केल्या आहेत.

रस्त्यावरील खड्डे हे मानवाधिकारचे उल्लंघन आहे.यासंदर्भात अनेक उच्च न्यायालयांनी निर्णय दिले आहेत.मानवी हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी शासकीय यंत्रणांनी काम करणे गरजेचे आहे.परंतु बार्शीतील या प्रश्नाकडे शासकीय यंत्रणा गंभीर्याने लक्ष देत नसल्याने तिथल्या नागरिकांचे मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे प्रश्न निर्माण झाले आहेत.त्यासाठी शासकीय यंत्रणेने ठोस पाऊले उचलण्याची गरज असल्याचे मानवाधिकार विश्लेषक विधिज्ञ असीम सरोदे यांनी सांगितले.

प्रथमच कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयाने मुख्याधिकारी बार्शी नगरपरिषद आणि पोलिस निरीक्षक बार्शी पोलिस स्टेशन विरुद्ध फौजदारी नोटिसेस काढल्यामुळे एका बाजूला राजकारण तापले आहे तर दुसरीकडे तक्रारदार मनिष देशपांडे आणि दीनानाथ काटकर यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

मी बार्शीतील नागरिकांना धूळमुक्त व आरोग्यपूर्ण वातावरण मिळावे या साठी आवाज उठविला आहे. चांगले रस्ते असावे व उत्तम गटार व्यवस्था असावे.या नागरी अधिकार यासाठी मी प्रयत्न करतो आहे.माझी कुणाविरुद्ध व्यक्तीगत तक्रार नसून नगर व्यवस्थापन चांगले व्हावे यासाठी आम्ही तक्रारी दिल्या आहेत. ही केस अ‍ॅड असीम सरोदे, अ‍ॅड प्रशांत एडके, अ‍ॅड अजित देशपांडे,अ‍ॅड सुहास कांबळे आणि अ‍ॅड अक्षय देसाई यांच्या मार्फत लढली जाईल असे जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय बार्शीचे मनीष देशपांडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *