Headlines

Congress sachin sawant slams pm narendra modi and bjp after vedant foxconn shift to gujarat spb 94



वेदान्त-फॉक्सकॉन प्रकरणावरून राज्यात सध्या आरोप-प्रत्त्यारोप सुरू आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला, असा आरोप अनेकांकडून करण्यात येत आहे. तर केंद्र सरकारच्या दबावामुळेच हा प्रकल्प गुजरातला गेला असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणावरून आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट करत ”मुख्यमंत्री मोदींचे अपयश पंतप्रधान मोदी निस्तरत आहेत” असा खोचक टोला पंतप्रधान मोदी यांना लगावला आहे.

हेही वाचा – Vedanta Foxconn Project : आदित्य ठाकरेंच्या आरोपाला सुधीर मुनगंटीवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “आरोप करणाऱ्यांना परिवाराची…”

काय म्हणाले सचिन सावंत?

“वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातच्या ढोलेराला नेण्याने केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचेही नुकसान होणार आहे. मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे अपयश पंतप्रधान मोदी निस्तरत आहेत. आजवर ढोलेरामधून अनेक कंपन्यांनी काढता पाय घेतला आहे. वेदान्त कंपनीने तळेगाव व ढोलेरा या दोन्ही स्थळांचा तुलनात्मक अभ्यास केला होता. कंपनीच्या अंतर्गत अहवालानुसार ढोलेरा येथे पाण्याची व कुशल कामगारांची कमतरता, इलेक्ट्रॉनिक्स इकोसिस्टिम नसणे, दुय्यम उत्पादकांची कमतरता व दलदलयुक्त जमीन अशी अनेक कारणे देऊन नापसंती व्यक्त केली होती. महाराष्ट्रातील तळेगाव हेच या प्रकल्पासाठी सुयोग्य जागा होती. या करिता महाराष्ट्राने गुजरातपेक्षा अधिक भांडवली अनुदानासहित अनेक सवलती देऊनही आयत्या वेळी सदर प्रकल्प ढोलेरा येथे नेण्याचा निर्णय केवळ केंद्र सरकारच्या दबावाखाली झाला आहे” , असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

हेही वाचा – Vedanta Foxconn Project: “महाराष्ट्रातील नेतृत्वाबरोबर…”; ‘वेदान्त’च्या मालकांची राज्यासाठी मोठी घोषणा; गुजरातला प्राधान्य का? याचंही दिलं उत्तर

“ढोलेरातून अनेक कंपन्यांनी पळ काढला”

“१० बिलियन डॉलर गुंतवणूकीच्या सेमीकंडक्टर उत्पादनासाठी देशात वेदान्त फॉक्सकॉन सहित तीन कंपन्यांनी अर्ज केला होता. त्यातील ISMC Digital ही कंपनी ढोलेराला येणार होती‌. या कंपनीबरोबर गुजरात सरकारचा सामंजस्य करारही झाला होता. आता कंपनीने सुविधा व पाण्याच्या कमतरतेमुळे पळ काढला आहे. जिओफोन ही ढोलेरा सोडून तिरुपतीला गेला. या अगोदर लॉकहीड मार्टीन कॉर्पोरेशन या कंपनीने सोलार बॅटरी प्रकल्पातून ढोलेरामधून माघार घेतली. HCC ही सोडून गेली आहे. केंद्र सरकारच्या अट्टाहासाने वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्पही अडचणीत येण्याची किंवा प्रदीर्घ काळ रखडण्याची शक्यता आहे”, असेही सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – ‘फॉक्सकॉन’वरून आरोप-प्रत्यारोप ; महाराष्ट्राने १२ हजार कोटींच्या जादा सवलती देऊनही गुजरातला पसंती दिल्याची टीका

“मोदींनी गुजरातमध्ये अव्यवहार्य निर्णय घेतले”

“गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये अनेक अव्यवहार्य प्रकल्प घोषित करुन हजारो करोड पाण्यात घातले. ढोलेरा हा त्यातीलच एक प्रकल्प आहे. असाच गिफ्ट सिटी प्रकल्प रखडला होता. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र तिथे नेले. गॅसचे साठे मिळाले असे दाखवून GSPC ला १० हजार कोटींचे रोखे घेण्यास भाग पाडले गेले. पुढे साठा काय तर गॅसच नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर कर्जबाजारी झालेल्या या कंपनीला केंद्रात सत्ता आल्यानंतर ओएनजीसीला विकत घेण्यास भाग पाडले गेले”, असा आरोपही सचिन सावंत यांनी केला आहे.

हेही वाचा – ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ गुजरातला गेल्याने शिवसेनेचा संताप; CM शिंदेंनी अकलेची दिवाळखोरी दाखवल्याची टीका करत म्हणाले, “शिंदेंचं नाव बदलून…”

नेमकं काय आहे प्रकरण?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदान्त समूहाने सेमीकंडक्टर प्रकल्पाबाबत महाराष्ट्राशी चर्चा सुरू केली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ‘वेदान्त ग्रुप’ आणि ‘फॉक्सकॉन’ कंपनीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. वेदान्तने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीशी भागीदारी केली करत या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते. मात्र, मंगळवारी वेदान्त समूहाने आपला प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले आणि महाराष्ट्राकडे येऊ घातलेला आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर विरोधकांडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply