“हे संताजी-धनाजी तर…” नाना पटोलेंचे शिंदे-फडणवीसांवर टीकास्र, लोकांना लॉलीपॉप देऊन सरकार चालवत असल्याचा आरोपCongress leader Nana Patole criticized eknath shinde and Devendra Fadanvis over cabinet expansion

[ad_1]

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकांना लॉलीपॉप देऊन हे सरकार चालवलं जात आहे, असा आरोप पटोलेंनी केला आहे. “फार वाईट परिस्थिती आहे. किती लोकांना घेऊन जायचं असेल त्यांना घेऊन जा. पण राज्य तर बरोबर चालवा. मंत्रिमंडळ विस्तार केला की सरकार पडेल याची शिंदे-फडणवीसांना भीती आहे. आमदारांना सांभाळण्यासाठी लॉलीपॉप देऊन सरकार चालवलं जात आहे”, असा घणाघात पटोलेंनी सरकारवर केला जात आहे.

“…शिंदेसाहेब जपून राहा” जितेंद्र आव्हाडांनी फेसबुक पोस्ट करत एकनाथ शिंदेंना केलं सतर्क

“हे सरकार बेईमानीने आलेलं सरकार आहे. तर हे संताजी-धनाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाहीत, तर गुजरातवाल्यांचे आहेत”, अशी टीकादेखील त्यांनी केली आहे. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील एका जाहीर सभेत उत्तर दिलं आहे.

“फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो, राज्यात मध्यावधी…”, संजय राऊतांचं सूचक विधान!

“एक नगरसेवक इतर पक्षात जाणार असेल, तर तो अनेकदा विचार करतो. येथे तर १२ खासदार, ५० आमदार सोबत घेऊन आम्ही वेगळा विचार केला. बाळासाहेबांच्या मनातील नैसर्गिक युतीला प्राधान्य दिले. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आमच्या पाठीशी ठाम आहे” असा विश्वास या सभेत शिंदेंनी व्यक्त केला. “काही लोक एका चेहऱ्यातून अनेक चेहऱ्यांचे रंग दाखवितात. त्या चेहऱ्यांप्रमाणे ते रंग बदलत राहतात. शिवसेनाप्रमुख, आनंद दिघे यांनी अशा बहूचेहऱ्यांचे संस्कार आमच्यावर कधीच केले नाहीत. आम्ही जे बोलतो ते करतो. झटपट कार्यक्रम करतो. आम्ही कधीही शब्द फिरवत नाही”, असेही शिंदे यावेळी म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *