Confirmd ! कतरिना कैफ गरोदर; विकी कौशल असे सांभाळतोय तिचे Mood Swings


मुंबई : Katrina Kaif is Pregnant: अभिनेत्री कतरिना कैफ हिनं ज्या क्षणी अभिनेता विकी कौशल याच्याशी लग्नगाठ बांधली, त्या क्षणापासून तिच्या आणि त्याच्या नात्यातील प्रत्येक गोष्टीनं सर्वांच्या नजरा वळवल्या. त्यानंतर आता कतरिना गरोदर असल्याचंही म्हटलं गेलं. 

अद्यापही कुटुंबीयांनी या बातमीला दुजोरा दिलेला नसला तरीही आता ही बाब स्पष्ट झाली आहे, की ‘सूर्यवंशी’ फेम अभिनेत्री, अर्थात कतरिना गरोदर आहे. 

कतरिना आणि विकीशी संलग्न सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती देत, बी टाऊनच्या या जोडीच्या नात्यात आता लवकरच एका नव्या पाहुण्याची एंट्री होणार असल्याचं सांगितलं आहे. 

विकी अशी घेतोय काळजी… 
सूत्रांच्या माहितीनुसार कतरिना आई होण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या ती जीवनातील एका सुंदर अशा वळणावरून जात आहे. या साऱ्यामध्ये ती तिच्या कमावर तसुभरही, परिणाम होऊ दिलेला नाही. (Katrina Kaif Vicky kaushal)

कतरिनाच्या दिनचर्येत आता सेवटच्या क्षणी बदल केले जात आहेत. तिची मानसिकता आणि इच्छा या साऱ्यावर हे निकष ठरवले जात आहेत. 

विकीसुद्धा तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करताना दिसत आहे. चित्रीकरणात व्यग्र असतानाही तो कतरिनासोबतही वेळ घालवत तिला काय हवं नको याची काळजी घेत आहे. 

कतरिनाच्या टीमनं ती गरोदर असल्याच्या बातमीला दुजोरा दिलेला नाही. पण, असं असलं तरीही प्रत्यक्ष चित्र मात्र फार वेगळं असल्याचं कळत आहे. सध्या कतरिनाला गरोदर असल्याचं खरं असलं तरीही अद्यापही तीन  महिन्यांचा काळही पूर्ण झालेला नाही. 

परिणामी कोणतीही गोष्ट घाईनं जाहीर करण्याऐवजी विकी आणि कतरिनानं ही बाब सध्यातरी गुलदस्त्यातच ठेवण्याला प्राधान्य दिल्याचं कळत आहे. Source link

Leave a Reply