Headlines

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात बार्शी तहसील कार्यालयासमोर निदर्शने

बार्शी / प्रतिनिधी – भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटनेच्या वतीने दिनांक 8 जुलै 2021 वार गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मा. तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस व वाढती महागाई, जिवनाश्यक वस्तुंची भाववाढ केंद्र सरकारने केले विरोधात तिव्र निदर्शने आंदोलन कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी श्रमिक, आदिवासी शेतकरी चळवळीचे नेते भीमाकोरेगाव एल्गार परिषद प्रकरणात जेलमध्ये मृत्यू पावलेले स्टॅन स्वामी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी कॉम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले, “केंद्र सरकार हे भांडवलदारांचे हित पाहत आहे तर कष्टकरी वर्गाला जगणे मुश्किल करत आहे, माणसे मरत आहेत आणि सरकार मंत्रिमंडळाच्या विस्तारात गुंतले आहे, महागाई वाढलेली असताना जनतेची दिशाभूल करण्यासाठी भाजपाने आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढला आहे, भाजप आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकांना फसवत आहे. “

आंदोलनाचे निवेदन मा. नायब तहसीलदार मुंडे यांना कॉम्रेड ए. बी. कुलकर्णी, कॉ.सुरेखा शितोळे यांच्या हस्ते देण्यात आले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड तानाजी ठोंबरे, कॉम्रेड प्रवीण मस्तूद, कॉ. अनिरुद्ध नखाते, शौकत शेख, कॉ. धनाजी पवार, कॉ. भारत भोसले, कॉ. लक्ष्मण घाडगे, कॉ.आनंद धोत्रे, कॉ.बालाजी शितोळे, कॉ.किसन मुळे, कॉ.जयवंत अांबिले, कॉ.सुनिल सालसकर, कॉ. संदीप तुपे, कॉ.संगीता गुंड, कॉ.निर्मला सरवदे, कॉ.विकास पवार, कॉ. आयाज शेख, तूषार कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply