Headlines

Commonwealth Game स्पर्धेत मिळणारं पदकं खरंच सोन्या चादींचं असतात का? जाणून घ्या

[ad_1]

Commonwealth Games Medal 2022: बर्मिंघम कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत पदकांचा वर्षाव केला आहे. जवळपास सर्वच खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी आपली कमाल दाखवली आहे. भारताने गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ पदक पटकावलं आहे. कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेतील मेडलचं डिझाईन तीन विद्यार्थ्यांनी केली आहे. हे विद्यार्थी बर्मिंगहॅम स्कूल ऑफ ज्वेलरीमध्ये शिकतात. अंबर अॅलिस, फ्रान्सिस्का विल्कॉक्स आणि कॅटरिना रॉड्रिग्स कैरो अशी त्यांची नावे आहेत. ब्रिटनमध्ये मेडल डिझाइन करण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये या तीन विद्यार्थ्यांनी बाजी मारली. असं असताना  अनेकांना प्रश्न पडतो की खरंच ही पदकं सोन्या चांदीचं असतात का?  की अन्य धातुंपासून बनवलेली असतात. चला तर मग जाणून घेऊयात कॉमनवेल्थ स्पर्धेत दिली जाणारी पदकं नेमकी कशी असतात, 

अशा प्रकारे पदके बनवली जातात

 स्पर्धेतील विजयी खेळाडूंना गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ पदके दिली जातात. पण स्पर्धेत पहिला क्रमांक पटकवणाऱ्या विजेत्या खेळाडूंना देण्यात येणारी गोल्ड मेडल सोन्याची नसतात. त्या मेडलला फक्त सोन्याचा मुलामा चढवलेला असतो. तथापि, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ पदके पूर्णपणे चांदी आणि तांब्यापासून बनवलेली असतात. वृत्तानुसार, या कॉमनवेल्थ गेम्समध्ये एकूण 1875 पदके तयार करण्यात आली आहेत. त्यापैकी 283 स्पर्धांमध्ये ही पदके दिली जाणार आहेत.

मेडलचे वजन किती असेल?

कॉमनवेल्थ गेम्स 2022 साठी तयार करण्यात आलेल्या मेडलमध्ये बर्मिंगहॅमचा नकाशाही तयार करण्यात आला आहे. या पदकाची रचना अंध खेळाडूंना जाणवेल अशा पद्धतीने करण्यात आली आहे. गोल्ड आणि सिल्व्हर पदकांचे वजन 150 ग्रॅम आहे. त्याच वेळी, ब्रॉन्झ पदक 130 ग्रॅमचे आहे. या पदकांचा व्यास 63 मिमी असतो.

1912 मध्ये देण्यात आलं होतं अस्सल गोल्ड मेडल

स्टॉकहोममध्ये 1912 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये शेवटचं सोन्याने बनवलेले गोल्ड मेडल देण्यात आले होते. मात्र, राष्ट्रकुल स्पर्धेत अशा पदकांचा वापर कधीच झाला नव्हता.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *