Headlines

Commonwealth Games नंतर बर्मिंगहॅममध्ये 2 बॉक्सर खेळाडू गायब

[ad_1]

मुंबई : पाकिस्तानात सध्या खळबळ उडालीये. याचं कारण नुकतंच कॉमनवेल्थ गेम्स खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये पोहोचलेले पाकिस्तानचे दोन बॉक्सर बेपत्ता झालेत. त्यांच्याबद्दल आतापर्यंत काहीही माहिती समोर आलेली नाही. या वर्षी जूनमध्ये हंगेरीतून पाकिस्तानचा एक जलतरणपटूही बेपत्ता झाला होता. आजपर्यंत त्याची काहीही माहिती सापडलेली नाही.

22 व्या कॉमनवेल्थ गेम्सचा समारोप या महिन्यात म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी बर्मिंगहॅममध्ये झाला आहे. यामध्ये सुलेमान बलोच आणि नजीरुल्लाह हे दोन पाकिस्तानी बॉक्सर भाग घेण्यासाठी पोहोचले. खेळ संपल्यानंतर दोघांनी टीम मॅनेजमेंटशी संपर्क साधला नाही. ते कुठेतरी बेपत्ता झालेत. आता पाकिस्तान आणि लंडनचे अधिकारी या दोन्ही बॉक्सरचा शोध घेत आहेत.

पासपोर्टसह इतर कागदपत्रं टीमकडे 

पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशनचे सचिव नासेर तांग म्हणाले, “दोन्ही बॉक्सरच्या पासपोर्टसह सर्व प्रवासी कागदपत्रं अजूनही बॉक्सिंग टीमसोबत कॉमनवेल्थ खेळासाठी गेलेल्या महासंघाच्या अधिकाऱ्यांकडे आहेत.” ही कागदपत्रे मानक कार्यप्रणाली (SOP) अंतर्गत ठेवण्यात आली होती. दोन्ही बॉक्सर बेपत्ता झाल्याची माहिती टीम मॅनेजमेंटने पाकिस्तान उच्चायुक्तालय आणि लंडनमधील संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.

बॉक्सरच्या बाबतीत 4 सदस्यीय समिती स्थापन

टीम मॅनेजमेंट सर्व खेळाडूंसह इस्लामाबादला रवाना होत असल्याचंही तांग यांनी स्पष्ट केलंय. याच्या काही तासांपूर्वी दोन्ही बॉक्सर गायब झाले होते. पाकिस्तान ऑलिम्पिक असोसिएशनने बेपत्ता बॉक्सरच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 4 सदस्यांची समिती स्थापन केली आहे.

यावेळी पाकिस्तानने दोन सुवर्णांसह 8 पदकं जिंकली आहेत. बॉक्सिंगमध्ये एकंही पदक पटकावता आलं नाही. पाकिस्तानने वेटलिफ्टिंग आणि भालाफेकमध्ये प्रत्येकी एक सुवर्ण जिंकलंय.

पाकिस्तानी जलतरणपटू फैजान जूनपासून बेपत्ता

जूनमध्येच पाकिस्तानी जलतरणपटू फैजान अकबर हंगेरीतून बेपत्ता झाला होता. फैजान फिना वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता. यातील विशेष बाब म्हणजे फैजानने त्या चॅम्पियनशिपमध्येही भाग घेतला नव्हता. बुडापेस्टमध्ये आल्यानंतर काही तासांतच तो पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांसह गायब झाला. जूनपासून त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *