‘फिल्मों में आओ, खबरों में नहीं’, कुणी दाखवली शाहरूखला खरी जागा


मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानने बुधवारी चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं. ‘पठान’ सिनेमाची पहिली झलक चाहत्यांसमोर आली. गेल्या कित्येक वर्षांपासून चाहते शाहरूख खानची मोठ्या पडद्यावर वाट पाहत आहेत. या सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. मात्र शाहरूख खानचा लूक अद्याप समोर आलेला नाही. फक्त त्याचा आवाज चाहत्यांच्या कानी पडला आहे. 

शाहरूख खानने थोड्यावेळाने चाहत्यांना एक सरप्राईज दिलं आहे. किंग खानने चाहत्यांनी ट्विटरद्वारे संवाद साधला. 

चाहत्याकडून शाहरूख खानला टोमणा 

या संवादा दरम्यान जगभरातील अनेकांनी शाहरूखला वेगवेगळे प्रश्न विचारले. शाहरूखने उत्तर देखील दिलं. नेहमीप्रमाणे शाहरूखने सगळ्यांची मन जिंकली.  

चाहत्यांनी शाहरूख खानला पर्सनल लाइफ, वर्क आणि येणाऱ्या प्रोजेक्टससंबंधीत प्रश्न विचारले. एका चाहत्याने शाहरूखला विचारलं की, सर कुठे गायब आहात, डिअर… फिल्मों में आओ, खबरों में नहीं. 

मग काय उशीर झाला, या चाहत्याला शाहरुखने प्रत्येक वेळी प्रमाणेच यावेळीही मजेशीर उत्तर देत सर्वांना प्रभावित केले. शाहरुखने लिहिले, “ठीक आहे, पुढच्या वेळी खबरदार बनून येईन… यासोबतच #Pathan हॅशटॅग देखील आहे. 

खरं तर, ती शाहरुखला चाहत्यांचा टोमणा होता. अलीकडेच शाहरुखचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अडकला होता. आर्यनला अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. 

आर्यन खानकडे ड्रग्स सापडलेच नाहीत. अशी माहिती आता समोर आली. Source link

Leave a Reply