आ. संजय शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने एक दिवस काम बंद आंदोलन

बार्शी – आमदार संजय शिरसाट औरंगाबाद पश्चिम यांनी ग्रामसेवक संवर्गाबद्दल अपशब्दचा वापर केल्याने त्यांचावर फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन बार्शी यांच्या वतीने बार्शीचे तहसीलदार सुनिल शेरखाने यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की औरंगाबाद येथे दिनांक ०८/११/२०२१ रोजी महिला सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते. साlदर कार्यक्रमामध्ये आमदार संजय शिरसाट औरंगाबाद पश्चिम यांनी आपला तोल सोडून भाषण केले. ग्रामसेवक बद्दल अर्वाच्च भाषा वापरून शिवीगाळ केली.ग्रामसेवक भामटे आहेत.महिला सरपंचाची फसवणूक करतात तसेच हरामखोर हा शब्द वापरला आहे. या वक्तव्यामुळे राज्यातील २२,०००/- ग्रामसेवकांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत.लोकप्रतिनिधी असे वक्तव्य कसे करू शकतात ? त्यांना भानावर आणणे गरजेचे आहे.

राज्यभर ग्रामसेवक अतिशय प्रतिकूल स्थितीत प्रामाणिकपणे कामे करत आहेत. श्री. शिरसाट यांनी जाहीर माफी मागावी आपले म्हणणे मागे घ्यावे. समाजामध्ये ग्रामसेवकबद्दल चुकीचा संदेश गेला आहे. त्यांचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा सोलापूर निर्णय दि.०८/११/२०२१ नुसार दिनांक ०९/११/२०२१ रोजी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेऊन सर्व ग्रामसेवक निषेध व्यक्त करतील.

तरी श्री. आमदार संजय शिरसाट औरंगाबाद पश्चिम यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १०७,२८८.२९४.४९९,५०४ ५०६ या कलम नुसार फौजदारी गुन्हा नोंद व्हावा व संबंधीतवर योग्य ती कार्यवाही व्हावी. अन्यथा एक दिवसीय आंदोलनाचे रूपांतर मोठ्या आंदोलनात होईल याची नोंद होण्यास विनंती. अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन बार्शीच्या वतीने तहसीलदार सुनील शेरखाने व सहायक गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.

Leave a Reply