Headlines

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सातव्या दिवशीही संप सुरूच, सुटाने नोंदवला पाठिंबा

बार्शी /प्रतिनिधी- महाराष्ट्र महाविद्यालय व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकेतरांच्या शासनाकडील प्रलंबित मागण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपामध्ये दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी संपाचा सातवा दिवशीही संप चालूच राहिला. या संपला सुटाचे डॉक्टर लिंगायत व्ही पी, प्रा. मुळे एस एस, जेवळीकर ए ए आदींनी या संपास पाठिंबा नोंदवला. आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सुधीर सेवेकर यांनी पाठिंब्याचे पत्र स्वीकारले तर सचिव डॉक्टर प्रवीण मस्तुद यांनी आभार मानले.

आश्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले जीआर पुर्नजिवीत करावेत, दहा वीस तीस वर्ष लाभांची आश्वासित प्रगती योजना, 796 विद्यापीठ कर्मचारी पदांना सातवा वेतन आयोग, 58 महिन्याचा फरक, पाच दिवसांचा आठवडा व इतर मागण्या संपामध्ये करण्यात आल्या आहेत.

संपाचा सातवा दिवस उजडून ही, शिक्षकेतऱ्यांचे प्रश्न मिटवले जात नाहीत, हे अत्यंत दुखत आहे असे मत संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड प्रा.तानाजी ठोंबरे यांनी व्यक्त केले उमेश मदने, अशोक पवार प्रा.पाटील व्ही ए, डॉ. वाघमारे व्ही एच, डॉ.संजय नाईनवाड, डॉ. नवनाथ दणाने, डॉ. गांधी, व्हनहुवे, डॉ. डोईफोडे एन आर आदी उपस्थित होते सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *