कॉलेज दिवसांत अशी दिसायची अभिनेत्री दिशा वकानी; फोटो व्हायरल


मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो प्रत्येक घरात  वर्चस्व गाजवत आहे. मात्र, या शोमध्ये काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी हा शो सोडला आहे. दयाबेन ही या शोमधील प्रेक्षकांची सर्वात आवडती व्यक्तिरेखा होती. जी आता या शोमध्ये नाही, पण तरीही ती लोकांच्या मनावर राज्य करते.

या मालिकेत दिशा वकानी दयाबेनच्या भूमिकेत दिसायची. सध्या ती आपला सगळा वेळ कुटुंबाला देत आहे. दिशाने पुन्हा एकदा शोमध्ये परतावं, असा अनेकवेळा निर्मात्यांनी प्रयत्न केला. दरम्यान, दिशाचा एक फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दिशा खूपच सुंदर दिसत आहे. दिशा वाकाणीचा हा फोटो कॉलेजदरम्यानचा असल्याचं सांगण्यात येत आहे. दिशाचा जन्म गुजरातमधील अहमदाबादमध्ये झाला, पण ती भावनगरमध्ये वाढली. दिशाने शाळेत असल्यापासून अभिनयाला सुरुवात केली होती. दिशा वकानीने अहमदाबादच्या गुजरात कॉलेजमधून नाट्य कला विषयात पदवी संपादन केली.

दिशा वकानीने अनेक गुजराती चित्रपटांमध्येही काम केलं आहे. दिशा वाकाणीला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. दिशाने अनेक शोमध्ये मोफतही काम केलं.

फार कमी लोकांना माहित असेल की दिशा वकानीने तिच्या करिअरची सुरुवात कोणत्याही टीव्ही शोमधून नाही तर चित्रपटातून केली होती. यानंतर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, 1997 मध्ये तिने बी-ग्रेड चित्रपट कॉमसिनमधून पदार्पण केलं. याशिवाय दिशा वकानीने देवदास, मंगल पांडे, सी कंपनी, जोधा अकबर, लव्ह स्टोरी 2050 या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. Source link

Leave a Reply