महाविद्यालयात बिकीनी चालते का? हिजाब वादात अभिनेत्रीची उडी; प्रियंका गांधींना खडा सवाल


मुंबई : कर्नाटकात सुरु असणाऱ्या हिजाब मुद्द्यावरून काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला. एकिकडे संपूर्ण देशात हा मुद्दा पेटला असताना आता यामध्ये काही राजकीय मंळींची मतंही समोर येऊ लागली आहेत. 

‘महिलांना त्यांच्या मनाला हवे तसे कपडे घालण्याचा हक्क आहे. संविधानातून त्यांना हा हक्क मिळाला आहे. मग ती बिकीनी असो, ओढणी असो, जीन्स असो किंवा हिजाब, हा महिलांचा अधिकार आहे, त्यांना त्रास देणं बंद करा, असं प्रियंका गांधी ट्विट करत म्हणाल्या. 

गांधी यांनी हे ट्विट करताच अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिनं त्यांना खडा सवाल केला. 

‘मिसेस वाड्रा, भारतीय संविधानात तुमच्या मतानुसार मुलींना शैक्षणिक संस्थांमध्ये बिकीनी घालण्याची परवानगी आहे? जर आहे, तर नक्की कोणत्या प्रकारची? मायक्रो बिकीनी सीथ्रू (हलक्या कपड्याची बिकीनी)? माझ्याकडे खूप साऱ्या आहेत… असं असेल तर मला त्या दुसऱ्यांना देण्यात आनंद असेल…. जर त्यांना हवं असेल’, असं तिनं ट्विट करत लिहिलं. 

शर्लिनच्या या ट्विटमुळे सध्या कला जगतामधूनही या प्रकरणातवर विविध मतं समोर येताना दिसत आहेत. 

देशातील विविध शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थीसुद्धा आमनेसामने उभे ठाकले आहेत. राजकीय वादाची किनार पाहता हे प्रकरण सध्या दिवसागणिक आणखी चिघळताना दिसत आहे. Source link

Leave a Reply