Headlines

मोची आणि मेट्रो कंपनीच्या चपलांवर हिंदू देवी-देवतांचे फोटो, भाजपा नेते अनिल बोंडेंकडून कारवाईची मागणी | mochi and metro company used durga devi photos on Slipper shoes advertisement anil bonde rmm 97



नवरात्री उत्सवानिमित्त मोची आणि मेट्रो या चप्पल बनवणाऱ्या कंपनीने जोड्यांच्या जाहिरातांमध्ये हिंदू देवी-देवतांचा फोटो वापरला आहे. या प्रकारामुळे हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या असून संबंधित कंपन्यांवर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते अनिल बोंडे यांनी केली आहे. तसेच सर्व हिंदू बांधवांनी संबंधित कंपन्यांच्या सर्व उत्पादनावर बहिष्कार टाकावा, असं आवाहनही बोंडे यांनी केलं आहे. ते अमरावती येथे पत्रकारांशी बोलत होते.

मोची आणि मेट्रो कंपन्यांवर कारवाईची मागणी करताना अनिल बोंडे म्हणाले, “मेट्रो आणि मोची कंपनीने जोड्यांची आणि चपलांची जाहिरात करण्यासाठी चक्क दुर्गादेवीचा फोटो वापरला आहे. मेट्रो कंपनीने नवरात्र सुरू झाल्यापासून फेसबूकवर ही जाहिरात दाखवली आहे. या जाहिरातीत वापरलेल्या चपलांवर दुर्गादेवीचा फोटो आहे. मोची कंपनीनेसुद्धा दुर्गादेवीचा फोटो वापरून हिंदू देवी-देवतांचा अपमान केला आहे. मोची कंपनीची जाहिरात फेसबूकवर सध्या लाइव्ह आहे.”

हेही वाचा- अखेर सस्पेन्स संपला! अमित शाह आणि फडणवीसांना मी भेटणारच; खडसेंचं स्पष्ट विधान, म्हणाले…

“हा प्रकार लक्षात आल्यानंतर आम्ही मोची कंपनीच्या सीईओशी संपर्क साधला पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. माफी मागितली नाही. शिवाय ही जाहिरात फेसबुकवर अद्याप सुरूच आहे. मेट्रो कंपनीचे अधिकाऱ्यांनाही ईमेलवरून तक्रार केली. पण त्यांनीही कोणतीही कारवाई केली नाही” अशी माहितीही अनिल बोंडे यांनी दिली.

हेही वाचा- “जेव्हा खरी गोष्ट समोर येईल, तेव्हा…” एकनाथ खडसे भाजपात जाण्याच्या चर्चेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

पुढे अनिल बोंडे म्हणाले, “या कंपन्या चपलांची जाहिरात करण्यासाठी हिंदू देवी-देवतांचा वापर करत आहेत. हिंदू देवी-देवतांचा अपमान करत आहेत. दुसऱ्या एखाद्या धर्माच्या देवतांचा फोटो वापरण्याची त्यांची हिंमत झाली नसती. ते हिंदू धर्माला गृहीत धरत असतील, तर महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की, हिंदू धर्मातील लोकांच्या भावना दुखावल्याप्रकरणी संबंधित कंपन्यांवर निश्चितपणे कारवाई करावी. त्याचबरोबर समस्त हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, त्यांनी मोची आणि मेट्रो कंपनीच्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार टाकावा. या कंपन्या जोपर्यंत हिंदू जनतेची माफी मागत नाहीत, तोपर्यंत या कंपनीची अमरावतीमधील दुकानं बंद करू, असा इशाराही बोंडे यांनी यावेळी दिला आहे.



Source link

Leave a Reply