Headlines

cm eknath shinde meets raj thackeray bjp shivsena mns alliance

[ad_1]

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आता दोन महिने उलटले आहेत. राज्यात हे सरकार स्थिरावू लागलेलं असतानाच दुसरीकडे मुंबईसोबत राज्यातील काही महत्त्वाच्या महानगर पालिकांच्या निवडणुकादेखील येऊ घातल्या आहेत. अवघ्या काही महिन्यांत या निवडणुका होण्याची शक्यता असताना राजकीय पक्षांनी त्यादृष्टीने हालचाली करायला सुरुवात केली आहे. एकीकडे भाजपा आणि मनसे यांच्या युतीची जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज ठाकरेंना शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी भेटायला जाणाऱ्या नेतेमंडळींची संख्यादेखील वाढू लागली आहे. याआधी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले. त्यामुळे या भेटीवरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेट?

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून राज ठाकरेंनी या सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच, भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक भूमिकांचं त्यांनी समर्थन देखील केलं होतं. या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपा युतीची चर्चा गेल्या दोन-अडीच वर्षांपासून सुरू आहेत. त्यात नुकताच राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर या चर्चेला अधिकच ऊत आला आहे. आगामी महानगर पालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे भाजपासोबत युती करण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांपाठोपाठ आता एकनाथ शिंदेंनीही राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी “मी कौटुंबिक कारणांसाठी ही भेट घेतली होती. त्यातून राजकीय अर्थ काढू नये. मात्र, युतीबाबतचा निर्णय आमचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी, अमित शाह, जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस हे घेतील”, असं बावनकुळे म्हणाले होते.

भाजपा-मनसे युती होणार? राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळेंचं सूचक विधान

मनसे आणि भाजपा या दोन्ही पक्षांकडून मात्र याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली नाही. या पक्षांच्या नेतेमंडळींकडून सातत्याने युतीबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, अशीच भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे युतीच्या चर्चांना अधिकच खतपाणी घातलं जात असताना राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील चर्चेबाबत वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.

शिवतीर्थवर बाप्पाचं दर्शन!

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणरायाच्या दर्शनासाठी दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, हे दोन प्रमुख नेते एकत्र आल्यानंतर त्यांच्यामध्ये राज्यातील आगामी राजकीय घडामोडी आणि नव्याने जुळलेल्या किंवा जुळणाऱ्या सत्तासमीकरणांवर चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ती चर्चा नेमकी काय असेल आणि त्यातून राज्यात नेमकी कोणती नवीन समीकरणं दिसून येतील, याची उत्सुकता सामान्य मतदारांसोबतच राजकीय वर्तुळातदेखील दिसत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *