Headlines

‘चित्रा वाघ माझी सासू…’, असं म्हणत Urfi Javed नं उडवली खिल्ली

[ad_1]

Urfi Javed Shared Post And Made Fun Of Chitra Wagh : सोशल मीडियातील वादग्रस्त अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचातला वाद टोकाला गेलाय. जिथे सापडेल तिथे उर्फी जावेदला चोप देण्याचा इशारा चित्रा वाघांनी दिलाय. भर रस्त्यावर अतरंगी कपडे घालून फिरणाऱ्या ऊर्फी जावेदविरोधात चित्रा वाघांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे (Mumbai Police Commissioner) तक्रार नोंदवून अटक करण्याची मागणी केली. इतकं सुरु असताना उर्फीनं सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिनं चित्रा वाघ यांची खिल्ली उडवली आहे. 

उर्फीनं तिच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत उर्फी म्हणाली, ‘मेरी डीपी इतनी ढासी, चित्रा वाघ मेरी सासू.’ खरंतर उर्फीनं ही पोस्ट शेअर करत चित्रा वाघ यांची खिल्ली उडवली आहे. उर्फीनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून नेटकरी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, हे तर लव्ह जिहाद झालं. दुसरा नेटकरी म्हणाला, अजून आपली खिल्ली उडवण्याचं बाकी आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, उर्फी इतनी ढासू, चित्रा वाघके निकले आसूँ. आणखी एक नेटकरी म्हणाला, सासू बाई कोमात सून बाई जोमात, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी उर्फीच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा : Ved Box Office Collection : ‘वेड’ चित्रपटानं प्रेक्षकांना केलं सैराट! रितेश- जिनिलियाच्या सिनेमानं मोडला नागराज मंजुळेंच्या चित्रपटाचा रेकॉर्ड

दरम्यान, उर्फीनं एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिनं तिच्या पायांचा एक फोटो टाकला आहे. फोटोसोबत तिनं कॅप्शनमध्ये असं लिहिलंय की, ‘मला कपड्यांची  ऍलर्जी आहे. त्यासोबत तो फोटो शेअर करताना आपल्या पायांवर उठलेले पुरळही (Allergy) तिनं दाखवले. त्यामुळे आपल्याला कपडे घालून ही  ऍलर्जी झाली असल्याचं या फोटोतून दर्शवलं आहे. तेव्हा आपण पुर्ण कपडे घातले तर आपल्याला ऍलर्जी होते असं सांगत तिनं आपल्या आजाराबद्दल लिहिलं आहे. 

चित्रा वाघ काय म्हणाल्या होत्या?

शी…ऽऽऽऽ अरे..हे काय चाललयं मुंबईत, रस्त्यांवर सार्वजनिक ठीकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला…मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही? तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *