Headlines

बार्शीतील यशोदा पार्क येथे बालदिन मोठ्या उत्साहात सहसंकल्प साजरा

बार्शी /प्रतिनिधी :एक सुजाण व निसर्गाशी नातं जोडून जगणारा माणूस घडणं ही आज काळाची गरज आहे.याच अनुषंगाने बार्शी येथील कासारवाडी रोड लगत असलेल्या यशोदा पार्क मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीच्या औचित्याने 14 नोव्हेंबर बालदिन हा एका वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

यशोदा पार्क मधील बागेत जून मध्ये वृक्षांची लागवड करण्यात आली होती या वृक्षांची संवर्धन करण्याची जबाबदारी पार्कमधील 14 वर्षाखालील वयोगटातील मुलां- मुलींनी घेतली.यासाठी मुलांना प्रोत्साहन देण्याकरिता यशोदा पार्क मित्र मंडळ यांनी प्रत्येक मुलास एक झाड दत्तक देऊन वर्षभर त्यांची निगा राखण्यासाठी पुढील वर्षी याच दिवशी मुलांना मंडळाच्या वतीने “वृक्षमित्र” नावाने एक चषक देऊन सन्मानित करण्याचे ठरवले. या दिवशी सकाळी मुलाने श्रमदान केले व दुपारी वृक्षसंवर्धन करण्याची शपथ घेतली .

याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री.विनोद गायकवाड सचिव श्री.धनंजय काळे तसेच ज्येष्ठ सदस्य लक्ष्मण लवळे,मा.अर्जून कडगंची यांच्या हस्ते मुलांना गुलाब पुष्प देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमास पार्क मधील मा.विशाल नलवडे ,मा.मच्छिंद्र पवार ,मा.विजय कांबळे ,मा.रणजित दराडे ,मा.बसवराज कट्टी ,मा.श्रीकांत ढेरे,मा.रणजित सोळगे,मा.धर्मा पाटोळे,मा.गाडे आदी सदस्य तसेच महिला मंडळ उपस्थित राहून मुलांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री.गणेश वाघमारे यांनी केले आणि आभार श्री.किरण लांडे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *