मुलाबाळांविषयी बोलू लागलेल्या रणवीरच्या संपत्तीचा आकडा माहितीये? पिढ्या बसून खातील इतकी श्रीमंती…

[ad_1]

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग यानं बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा तो सर्वांच्याच पसंतील उतरला असं नाही. पण, काळानुरुप त्यानं स्वत:मध्ये काही बदल केले. दमदार चित्रपट त्याच्या वाटेला चालून आले आणि पाहता पाहता रणवीर एक यशस्वी अभिनेता म्हणून सर्वांसमोर आला. (you will be shocked seeing Bollywood Actor Ranveer Singh net worth cars collection)

त्यानं साकारलेले ‘बाजीराव’, राम रजाडी आणि अशा कित्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कायमचा छाप पाडून गेल्या. मनमिळाऊ स्वभाव आणि काहीशी खोडकर वृत्ती हे त्याच्या स्वभावातील आणखी काही गुणविशेष. अभिनेत्री दीपिका पदुकोणशी लग्न केल्यानंतर आता मुलांबाबत स्पष्टपणे बोलणारा रणवीर सर्वांच्या नजरा वळवू लागला आहे. 

असा हा रणवीर जितका त्याच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो, तितकाच त्याच्या संपत्तीच्या आकड्यामुळं प्रकाशझोतात येतो. नवखा कलाकार ते अनुभवी आणि सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता अशी त्याची ओळख तयार होताना अनेकांनीच पाहिली. 

आयुष्यातील सर्व दिवस सारखे नसतात, याचा अनुभवही त्यानं घेतला. 2011 मध्ये त्यानं आर्थिक अडचणींचा सामना केला. पण, आता मात्र परिस्थिती स्थिरस्थावर आहे. रणवीरनं आतापर्यंतच्या कारकिर्दीत साधारण 300 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

फक्त खात्यातील रक्कमच चक्रावणारी नाही, तर रणवीरच्या दारी उभ्या असणाऱ्या महागड्या कारचं कलेक्शनही थक्क करणारं आहे. लॅम्बॉर्गिनी, अॅस्टन मार्टिन, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, रेंज रोवर, ऑडी अशा कोट्यवधींची किंमत असणाऱ्या कार त्याच्याकडे आहेत. महागड्या कार एकिकडे, पण रणवीरकडे सर्वात स्वस्त कारही आहे. ही कार म्हणजे मारुती सुझुकीची सिआज. या कारची किंमत 12 लाख रुपये इतकी आहे. Maruti Suzuki या कंपनीकडून ही कार त्याला भेट स्वरुपात देण्यात आली होती. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *