मुख्यमंत्री शिंदे रात्री ‘वर्षा’ बंगल्यावर पोहोचले; बंगल्यातून बाहेर पडताना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर म्हणाले, “अरे बाबा…” | eknath shinde visits maharashtra cm official residence varsha bungalow scsg 91राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असणाऱ्या ‘वर्षा’ बंगल्याला भेट दिली. शिंदे यांनी ‘वर्षा’ बंगल्यामध्ये सुरु असणाऱ्या डागडुजी आणि नुतनिकरणाच्या कामाची पहाणी करण्यासाठी ही भेट दिल्याचं पत्रकारांना सांगितलं. सध्या शिंदे हे महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये त्यांना देण्यात आलेल्या ‘नंदनवन’ या बंगल्यामध्ये वास्तव्यास आहेत. शिंदे यांची गाडी ‘वर्षा’ बंगल्यामधून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांनी त्यांना येथे रहायला येण्यासंदर्भात अनेक प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना शिंदेंनी अजून रहायला येण्यास वेळ असल्याचं सांगितलं.

नक्की पाहा >> Photos: …तर शिंदे गटात बंडाची शक्यता; मुख्यमंत्र्यानी घेतलेल्या ‘त्या’ बैठकीत पाच आमदारांनी उघडपणे व्यक्त केली नाराजी

३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ९ जुलै रोजी म्हणजेच ३९ दिवसांनी शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रात्री शिंदे हे ‘वर्षा’ बंगल्याची पहाणी करण्यासाठी आले होते. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या या बंगल्याच्या डागडुजीचं काम सुरु आहे. शिंदे याच कामाची पहाणी करण्यासाठी आले असता बंगल्याच्या मुख्यप्रवेशद्वाराबाहेर आल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नक्की वाचा >> शिवसेनेच्या धनुष्यबाणावरुन वाद कशाला म्हणणाऱ्या शरद पवारांना फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “पवारांनी पक्ष बदलला त्यावेळी…”

पत्रकारांनी ‘भाई भाई’ अशी हाक मारत शिंदेंची गाडी थांबवून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर पहिली प्रतिक्रिया देताना शिंदे यांनी, “राहायला नाही आलोय बाबा” असं म्हटलं. पुढे शिंदे यांनी, “पहाणी करायला आलो होतो. रहायला येण्यासाठी वेळ आहे,” असंही म्हटलं. यावर पत्रकारांनी, “पुजा वगैरे कधी?” असं विचारलं असता शिंदेंनी, “अरे बाबा पहायला आलोय. राहायला यायला अजून वेळ आहे,” असं म्हणाले. “थोडं काम बाकी आहे. ते झालं की नक्की रहायला येऊ,” असंही शिंदे म्हणाले. यावर पत्रकारांनी, “कधीपर्यंत रहायला येण्याची शक्यात आहे?” असं विचारलं. यावर शिंदेंनी हसत, “अजून १५-२० दिवस लागतील,” असं उत्तर दिलं.

नक्की वाचा >> ४४ हजार २७० कोटींचा मालक आहे शिंदे सरकारमधील ‘हा’ मंत्री; पहिल्यांदाच मंत्रीमंडळामध्ये मिळालं आहे स्थान

जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर हा बंगला सोडून आपल्या खासगी निवासस्थानी म्हणजेच ‘मातोश्री’ बंगल्यावर मुक्काम हलवला. तेव्हापासून या बंगल्यामध्ये कोणीच राहत नाही. मात्र या कालावधीचा वापर बंगल्याची डागडुजी करण्यासाठी करण्यात आला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केली जाते. हे खातं महाविकास आघाडी सरकारमध्ये शिंदे यांच्या अंतर्गतच होतं. ‘वर्षा’ बंगल्याच्या प्रवेशद्वारावर एका बाजूला बंगल्याचं नाव तर दुसऱ्या बाजूला ‘एकनाथ संभाजी शिंदे’ असं नाव लावण्यात आलेलं आहे.Source link

Leave a Reply