Headlines

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाणून बुजून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांचा निधी थांबवला”; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप | NCP allege restrictions on fund of Congress NCP MLA by CM Eknath Shinde pbs 91

[ad_1]

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (१६ जुलै) घेतलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेना आमदारांचा निधी रोखला नाही, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांचा निधी रोखला,” असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. जे एकनाथ शिंदे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निधीबाबत आरोप करत होते त्याच एकनाथ शिंदेंनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत दुजाभाव केला, असंही तपासे यांनी म्हटलं.

महेश तपासे म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट बैठकीत नगर विकास विभागाने घेतलेल्या निर्णयांना आणि दिलेल्या निधीवर रोख लगावली आहे. तो निधी थांबवला आहे आणि जाणून बुजून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसोबत दुजाभाव करण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रीमंडळ बैठकीत शिवसेना आमदारांचा निधी रोखला नाही.”

हेही वाचा : “जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली त्याचं कारण शरद पवार”; केसरकरांच्या दिल्लीतील आरोपावर राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर, म्हणाले…

“याआधी ते अजित पवारांनी निधी दिला नाही असा आरोप करत होते. मात्र, अजित पवारांनी सर्वांना सारखाच निधी दिला. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळ बैठकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांचा निधी रोखला. यामुळे अजित पवारांनी कधीही जो दुजाभाव केला नाही, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला हे स्पष्ट होतंय,” असा आरोपही महेश तपासे यांनी केला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *