Headlines

chief minister eknath shinde speak about real shiv sena in loksatta loksamvad event zws 70

[ad_1]

मुंबई : शिवसेना वाढविण्यासाठी हजारो शिवसैनिकांनी त्याग केला. पक्ष वाढविणे हे नेतेमंडळींपासून सामान्य कार्यकर्त्यांचे एकमेव उद्दिष्ट होते. त्यादृष्टीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षात बारकाईने लक्ष घालत असत. पण, विद्यमान नेतृत्व आमदारांपासून सामान्य शिवसैनिकांच्या भावनेकडे दुर्लक्ष करीत होते. केवळ घरात बसून मर्यादित काम करून भागत नाही. शिवसेना ही काही ठराविक लोकांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. बाळासाहेबांची शिवसेना वाढविण्यासाठीच आम्ही हा मार्ग पत्करला, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ उपक्रमाच्या उद्घाटनानिमित्त बोलताना दिली.

‘लोकसत्ता’ कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी राज्यासमोरील आव्हाने, ‘फॉक्सकॉन’ने महाराष्ट्राऐवजी गुजरातला पसंती देणे, उद्योगांमधील गुंतवणूक, मुंबई आणि महानगरातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प, मुंबईतील रस्ते अशा विविध विषयांचा उहापोह करतानाच बंडामागील पार्श्वभूमीही विशद केली. ‘‘मी वयाच्या १७व्या वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय काम करीत आहे. शिवसेना वाढविण्यासाठी त्याग केला. घराकडे दुर्लक्ष झाले. शिवसेना वाढली पाहिजे, हे एकमेव माझे लक्ष्य असायचे. सारे आयुष्य शिवसेनेसाठी खर्च केले. अशा वेळी मी शिवसेना सोडण्याचा विचारही करू शकत नाही. तसे माझ्या मनातही कधी येणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली शिवसेना राहिली नव्हती. आमदारमंडळी त्रस्त होती. सामान्य शिवसैनिक अस्वस्थ होते. म्हणूनच भाजपबरोबर युती करण्याचा निर्णय घेतला,’’ असे शिंदे यांनी सांगितले. ही आमची नैसर्गिक युती आहे. भाजपबरोबर युती केल्याने सामान्य नागरिक तसेच शिवसैनिक समाधानी असल्याचा दावाही त्यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला नेहमीच विरोध केला. त्याच काँग्रेस-राष्ट्रवादीशी शिवसेनेच्या नेतृत्वाने युती केली होती. या विचारांपासून आम्ही फारकत घेतली, असा दावा शिंदे यांनी केला.

‘फॉक्सकॉन’ला आमच्या सरकारने विविध सवलती देण्याची तयारी दर्शविली होती. आमच्या बैठकाही झाल्या होत्या. पण, आधीच्या सरकारच्या काळात या प्रस्तावाबाबत दुर्लक्ष झालेले दिसते. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावर मी केंद्रातील दोन्ही सर्वोच्च नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यांनीही राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले.

गुंतवणुकीचा ठाकरे सरकारचा दावा फसवा गेल्या दोन – अडीच वर्षांत राज्यात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक झाली आणि लाखो रोजगार वाढल्याचा महाविकास आघाडीचा दावा फसवा असल्याचे शिंदे म्हणाले. या काळात करार झाले असले तरी द्रु्देवाने प्रत्यक्ष गुंतवणूक काहीच झालेली नाही. उद्योगांना आकर्षिक करण्याऐवजी मधल्या काळात जमिनींच्या विक्रीचा उद्योग वाढला होता. त्याची आम्ही माहिती घेत आहोत. आमचे सरकार उद्योगाच्या नावाखाली जमीन विक्रीचा उद्योग करणार नाही. राज्यात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक होऊन रोजगार वाढेल, याकडे आमचे लक्ष असेल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकारच्या अखेरच्या काळातील निर्णयांना स्थगिती देण्यात आल्याबद्दल विरोधकांकडून टीका करण्यात येते. पण, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर फडणवीस सरकारच्या अखेरच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयांना स्थगिती देण्यात आली होती, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. आमचे सरकार सर्व निर्णय रद्द करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रस्ते चकाचक करणार

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत नेहमीच चर्चा होते. दरवर्षी कोटय़वधी खर्च करूनही खड्डे कायम असतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये मी नगरविकासमंत्री होतो तरी माझ्याकडे सारे अधिकार नव्हते, असे सांगत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला. आता माझ्याकडे सारे अधिकार आल्यावर मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यावर भर दिला आहे. सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. दोन वर्षांत मुंबईतील सारे रस्ते काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. ठाण्यातील शिळफाटा ते भिवंडीदरम्यानच्या सध्याच्या मार्गावर उन्नत मार्ग बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे यांचे ‘लोकसत्ता’च्या कार्यकारी प्रकाशक वैदेही ठकार यांनी स्वागत केले, तर ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तसमूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका यांनी रेखाचित्र भेट दिले. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी लोकसंवाद कार्यक्रमामागील भूमिका विशद केली.

 ‘मुख्यमंत्रीपद कायम राखण्याची उद्धव ठाकरेंची इच्छा होती

भाजपबरोबर सरकार स्थापन करावे, अशी विनंती माझ्यासह अनेकांनी ठाकरे यांच्याकडे केली होती. उद्धव ठाकरे यांची तशी तयारी होती. पण, उर्वरित काळासाठी मुख्यमंत्रीपद कायम राहावे ही त्यांची इच्छा होती. मी भाजपबरोबर चर्चा करावी, अशी त्यांची भूमिका होती.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याची तयारी दर्शविली होती. ही जबाबदारी माझ्याकडे यावी, अशी फडणवीस यांची इच्छा होती. पण, बहुधा शिवसेनेच्या नेतृत्वाच्या मनात तसे नसावे. म्हणूनच उपमुख्यमंत्रीपद घेतले नसावे.

ठाणे शहराच्या सीमेवरील टोलच्या विरोधात मी आंदोलन केले होते. आता हा टोलचा विषय संपविण्यासाठी काही तरी मार्ग काढला जाईल.

बॉलिवूडला विश्वास आणि बळ हवे आहे. त्यांना नैतिक बळ दिल्यास चित्रपटसृष्टी मुंबईत अधिक विकसित होईल.

फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेला असला तरी महाराष्ट्रात नव्याने मोठी गुंतवणूक होईल. मात्र फॉक्सकॉनला अजूनही महाराष्ट्राची दारे खुली आहेत.

– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *