Headlines

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिदे यांच्या नावाची घोषणा, गोव्यातील आमदारांचा एकच जल्लोष

[ad_1]

मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या घोषणेनंतर गोव्यातील शिंदेच्या आमदारांनी हॉटेलमध्य़े तुफान डान्स करून एकचं जल्लोष केला. आमदारांच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आता समोर आला आहे.  

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासमोर सरकार स्थापनेचा दावा केला.राज्यपालांची भेट घेतल्यानंतर फडणवीस आणि शिंदे यांनी राजभवनात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. 

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आज संध्याकाळी 7.30 वाजता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. नवीन सरकार स्थापन करण्यासाठी 170 हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून शिवसेना आणि भाजपचे नेते शपथ घेणार आहेत. 

देवेंद्र फडणवीसाच्या मुख्यमंत्रीपदी  एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर ठाण्यासह अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. तसेच गोव्यात असलेल्या शिंदे गटातील आमदारांनी देखील हॉटेलमध्ये तुफान जल्लोष केला. आमदारांनी टेबलवर चढून तुफान डान्स केला.या डान्सचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.   

देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतला 120 आमदार संख्या असताना देवेंद्र फडणवीस हेही मुख्यमंत्रीपद घेऊ शकले असते, पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला, त्यांचे आणि पंतप्रधान, गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानतो. ही एक ऐतिहासिक घटना आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *