छळ… नुसता छळ…. ; जेव्हा दणकट अभिनेता Nude होत प्रेक्षकांसमोर येतो….

[ad_1]

मुंबई : मनोरंजन क्षेत्रातल्या घडामोडींवर एक नजर टाकली तर त्यातल्या बहुतांश घडमोडी किंवा चर्चा या अभिनेत्रींभोवतीच फिरताना दिसतात. मुख्य म्हणजे अभिनेत्रीनं एखाद्या नव्या स्टाईव स्टेटमेंटबद्दल काही म्हटलं तरीही त्याची चर्चा होते. पण, तुम्हाला माहितीये का, अभिनेत्रींप्रमाणं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेतेसुद्धा अशाच काही कारणांमुळे चर्चेत आले आहेत. 

हल्ली जी काही Nude फोटोंची चर्चा होते, ती चर्चा फक्त अभिनेत्रींपुरता सीमीत नसून, चित्रपट, कथानकाची मागणी म्हणून काही अभिनेतेही ऑनस्क्रीन Nude झाले होते. (Bollywood Movies)

आमिर खानपासून राजकुमार रावपर्यंत बऱ्याच अभिनेत्यांनी आतापर्यंत काही चित्रपटांसाठी असे सीन दिले आहेत. हे खरंतर धाडसच म्हणावं लागेल. 

अभिनेता रणबीर कपूर यानं ‘संजू’ या चित्रपटासाठी असा एक सीन दिला होता. जिथं तो कारागृहात दिसला होता. 

रणबीर कपूर न्यूड सीन

परफेक्शनिस्ट आमिरनंही PK या चित्रपटासाठी अशाच प्रकारचा निर्णय घेत न्यूड सीन दिला होता. ‘जेल’ या चित्रपटामध्ये अभिनेता नील नितीन मुकेश यानंही असाच सीन दिला. चित्रपट गाजला नाही, पण नीलचा हा सीन बराच चर्चेत आला. 

आमिर खान न्यूड सीन

नील नितिन मुकेश न्यूड सीन

‘न्यूयॉर्क’ चित्रपटामध्ये अभिनेता जॉन अब्राहम न्यूड दिसला होता. कारागृहात होणारा छळ या दृश्यातून दिसला होता. दणकट जॉनचं हे रुप अनेकांनाच धक्का देऊन गेलं. त्याच्या अभिनयाची इथं बरीच प्रशंसा झाली. 

जॉन अब्राहम न्यूड सीन

आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता राजकुमार राव ‘शाहिद’ या चित्रपटासाठी अशा दृश्यातून प्रेक्षकांसमोर आला. कलेप्रती असणारी या कलाकारांची समर्पकता पाहता त्यांच्या या भूमिकांचीही बरीच प्रशंसा झाली होती. 

राजकुमार राव न्यूड सीन



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *