Headlines

चेतना सिन्हा यांचा अमेरिकेत बिल क्लिंटन यांच्या हस्ते सन्मान 

[ad_1]

वाई: येथील माण देशी महिला बँक व माण देशी फौंडेशनच्या माध्यमाने  ग्रामीण भागातील महिलांना डिजिटल साक्षर करण्यास दिलेल्या योगदानाची दखल घेऊन श्रीमती चेतना सिन्हा यांना अमेरिकेतील ‘क्लिंटन ग्लोबल इनिशियेटिव्ह’ कार्यक्रमात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन व माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 

जागतिकहवामान बदलाचे परिणाम आज ग्रामीण भागामध्ये विशेषत: शेती व्यवसायावर जाणवत आहेत. यापुढे या समस्येवर काम करण्याचा मानस ‘क्लिंटन ग्लोबल  इनिशियेटिव्ह’ या कार्यक्रमात श्रीमती सिन्हा यांनी व्यक्त केला.

भारतातील माण देशामधील ग्रामीण भागातील हवामानातील बदल व त्याचा पिकांवर होणाऱ्या परिणामावर या समस्येचे निवारण करणे गरजेचं आहे.  ग्रामीण भागातील महिलांना डिजिटल साक्षर करण्याचा जो उपक्रम माण देशी राबवित असून त्याची दहा लाख महिलांपर्यंत व्याप्ती कशी होत गेली. या उपक्रमामुळे दहा लाख ग्रामीण भागातील महिलांचे आयुष्य कसे बदलत गेले याबद्दल सविस्तर माहिती श्रीमती सिन्हा यांनी सांगितली.  याबरोबरच माण देशी ग्रामीण तरुण मुलींना खेळाच्या माध्यमातून जागतिक स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. करोनाच्या साथीच्या संकटानंतर ग्रामीण भागातील आरोग्य सेवेतील त्रुटी निदर्शनास आल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी माण देशीने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातही सेवा कार्य सुरू केले असल्याची माहिती  दिली.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *