chandrashekhar bawankule replied to uddhav thackeray On dynasty alligation spb 94शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गटनेत्यांच्या मेळाव्यात भाजपावर सडकून टीका केली. गेल्या काही दिवसांपासून माझ्या घराण्यावर आणि वंशावरून टीका होते आहे. मात्र, भाजपाच्या तर वंशाचा वाद आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरेंना यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा वापर केला. त्याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात; म्हणाले, “ज्यांना सत्तेचं दूध पाजलं…”

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

“आज वशंवादावरून माझ्यावर टीका होत आहे. माझ्या घराण्यावर टीका होते आहे. मात्र, मला माझ्या वंशाचा अभिमान आहे. माझ्या घरण्याचा मला अभिमान आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समिती फोडणारे हे जनसंघ होते. मात्र, तुमच्या वंशावरूनच वाद आहेत. भाजपाने पक्षात केवळ उपरे भरून ठेवले आहेत की आता तुमचे बावनकुळे की एकशे बावनकुळे हेच कळत नाही आहे”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.

चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले प्रत्युत्तर

दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “उद्धव ठाकरे हे वारंवार माझ्या कुळाचा कुत्सितपणे उल्लेख करतात. माझे वडील शेतकरी आहेत. आई- वडिलांनी मोठ्या कष्टातून मला घडविले. केवळ त्यांच्या कष्टाचा, संघर्षाचा वारसा मला मिळाला आहे. दुसरे काही नाही. गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्मास येणे गुन्हा आहे का? माझ्या कुळाचा उद्धार करून उद्धव ठाकरे यांचे नैराश्य दूर होत असेल तर तो माझ्या कुळाचा सन्मानच आहे.”, असे ते म्हणाले.Source link

Leave a Reply