Chandrasekhar Bawankule replied to Ajit Pawar warning to officers spb 94रविवारी साताऱ्यात झालेल्या एका सभेत बोलताना अजित पवार यांनी राज्यातील अधिकाऱ्यांना इशारा दिला होता. “अधिकाऱ्यांनी कोणाच्या दबावाला बळी पडू नये. आम्ही कधी सत्तेत येऊ तुम्हाला कळणारही नाही” असे वक्तव्य त्यांनी केले होते. अजित पवारांच्या या वक्तव्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना खोचक टोला लगावला आहे.

हेही वाचा – Shinde vs Thackeray: शिंदेंच्या बंडानंतरची पहिली निवडणूक जाहीर, रंगणार नवा ‘सामना’, पण चिन्हाचं काय?

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

“अजित पवारांना आता सत्तेची स्वप्न पडायला लागली आहे. अजित पवार यांनी गेल्या अडीच वर्षात राज्यात मोगलशाही सारखं एकतर्फे सरकार चालवलं आहे. त्यामुळे आता ते कधीच सत्तेत येणार नाहीत. अशी परिस्थिती आहे ”, असा खोचक टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी अजित पवारांना लगावला आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याच्या धमकीवर गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; फडणवीस म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेसह…”

काय म्हणाले होते अजित पवार?

साताऱ्यातील शेतकरी मेळाव्यात बोलताना, “आम्ही सत्तेत असताना आमच्या हातात सर्व संस्था होत्या. पण आम्ही कधी सत्तेचा माज दाखवला नाही. आज राज्यात जे काही चाललं आहे, ते गंभीर आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना मला एढचं सांगतो की, कुणाच्याही दबावाला बळी पडू नका. सत्तेत असणाऱ्यांच्या सांगण्यावरुन कोणालाही त्रास देऊ नका. आम्ही सत्तेत कधी येऊ, हे तुम्हाला कळणार नाही” , असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला होता.Source link

Leave a Reply