Chandra Grahan 2022: या राशीच्या लोकांना आजच्या चंद्रग्रहणाचा मोठा फायदा


मुंबई : यंदाच्या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आज म्हणजेच 16 मे 2022 सोमवारी आहे. या ग्रहण वृश्चिक राशीला लागणार आहे. आज वैशाख पौर्णिमा आहे. त्यामुळे ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती विशेष असणार आहे. 

यंदाच्या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे सूतक काळ मानला जाणार नाही. या ग्रहणाचा परिणाम वाईट होतो असं म्हणतात. पण काही राशींसाठी हेच ग्रहण फायद्याचं ठरू शकतं. अशा कोणत्या राशी आहेत ज्यांच्यासाठी हे ग्रहण खूप फायदेशीर ठरेल जाणून घेऊया. 

मेष- करिअरमध्ये चांगली प्रगती होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. करिअरच्या नव्या संधी मिळतील. नातेसंबंध अधिक चांगले होतील. आयुष्यात सुख आणि समृद्धी वाढेल. 

वृषभ- या राशीसाठी चंद्रग्रहण खूप शुभ असणार आहे. भविष्यात खूप चांगल्या गोष्टी होणार आहेत फक्त संयम बाळगायला हवा. मान सन्मान वाढेल. आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. 

सिंह – या राशीच्या लोकांना ग्रहणाचा मोठा फायदा होणार आहे. करिअरमध्ये चांगलं वातावरण राहील मोठा फायदा होईल. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. वाद होणार नाही याची काळजी घ्या. 

धनु- या राशीच्या लोकांसाठी ग्रहण काळ सकारात्मक असणार आहे. कामाच्या ठिकाणी चांगलं उत्पन्न मिळेल. अपेक्षेनुसार गोष्टी होतील. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. आयुष्यात आनंद बहार आणेल. कुटुंबात प्रेम वाढेल. 

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)Source link

Leave a Reply