Headlines

Chandra Grahan 2022: चंद्रग्रहण जवळ येतंय, पाहा किती तासांसाठी असेल सूतक काळ

[ad_1]

Lunar Eclipse 2022 Date: यंदाच्या वर्षातील म्हणजेच 2022 मधील शेवटच्या सूर्यग्रहणानंतर आता अवघ्या काही दिवसांवर वर्षातील शेवटचं पूर्ण चंद्रग्रहण (Chandra Grahan 2022) येऊ घातलं आहे. कार्तिक पौर्णिमेला (Kartik Paurnima) म्हणजेच 8 नोव्हेंबरला हा चंद्रग्रहणाचा योग आहे. या दिवशी खरंतर देवदिपावली (Dev Dipawali) साजरी केली जाते. पण, यावर्षी चंद्रग्रहण असल्यामुळं देवदिवाळीचा योग एक दिवस आधीच आला आहे. (Diwali) दिवाळीवरही यंदा अशाच प्रकारे ग्रहणाचं सावट आलं होतं. ही त्याचीच पुनरावृत्ती. 

चंद्रग्रहण काळ 

2022 या वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण भारतीय प्रमाण वेळेनुसार 8 नोव्हेंबरला सायंकाळी जवळपास 5 वाजून 32 मिनिटांनी सुरु होऊन सायंकाळी 7 वाजून 27 मिनिटांपर्यंत सरु असेल. ज्योतिषविद्येमध्ये (Astrology) सांगितल्यानुसार चंद्रग्रहणाचा सूतक काळ हा ग्रहणाच्या तब्बल 9 तास आधीपासून सुरु होणार आहे. भारतात हे ग्रहण काही भागांमध्येच दिसणार आहे, असं असलं तरीही त्याचा सूतक काळ मान्य असणार आहे. 

खगोलशास्त्राच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची घटना आहे 

जिथं ज्योतिषविद्येमध्ये ग्रहणाची घटना अशुभ मानली जाते. पण, खगोलशास्त्रामध्ये मात्र याकड़े अतिशय महत्त्वाच्या घटनेच्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. ज्यावेळी सूर्य आणि चंद्राच्या पृथ्वी मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहणाची परिस्थिती उदभवते. यामध्ये चंद्रावर पृथ्वीची सावली पडल्यामुळे तो दिसत नाही. आहे की नाही ही रंजक बाब? 

चंद्रग्रहणादरम्यान काय करु नये? 

ज्याप्रमाणे सूर्यग्रहणाच्या सूतक (Sutak kaal) काळात काही गोष्टी करणं अशुभ मानलं जातं. अगदी त्याचप्रमाणे चंद्रग्रहणामध्येही काही गोष्टी करु नयेत अशी धारणा आहे. 
– चंद्रग्रहण काळात पूजा-पाठ, कोणतंही शुभकार्य करु नये. 
– देवघर, मंदिराची कवाडं या काळात बंद ठेवावीत.
– सूतक काळामध्ये काहीच खाऊ- पिऊ नका. 

– घरात शिजलेलं अन्न असल्या त्यामध्ये आणि त्यासोबतच दूध, दही यांमध्ये तुळशीपत्र टाका. 
– सूतक काळात तुळशीला स्पर्श करु नका, त्याआधीच तुळशीपत्र काढून ठेवा. 
– चंद्रग्रहणानंतर स्नान करुन शुद्ध व्हा. घरामध्ये तुळशीपत्रमिश्रित पाणी शिंपडा, अशानं नकारात्मक उर्जा निघून जाते. 
– ग्रहणकाळानंतर शुद्धीची प्रक्रिया पूर्ण होताच शक्य असल्यास दान करा, पुण्य मिळेल. 

(वरील माहिती सर्वसामान्य धारणांवर आधारलेली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *